Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?

Shehzad Poonawalla Qualification: भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आलेले शहजाद पूनावाला नक्की किती शिकले आहेत? वकिलीची पदवी घेतलेले पूनावाला राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या त्यांचा संपूर्ण शैक्षणिक आणि राजकीय प्रवास...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 02, 2026 | 12:58 PM
poonawala

poonawala

Follow Us
Follow Us:

Shehzad Poonawalla Resigns:  भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेले शहजाद पूनावाला सध्या त्यांच्या राजीनाम्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांचा आढावा देत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर लोक त्यांच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

अनेक लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की शहजाद पूनावाला नक्की किती शिकले आहेत आणि राजकारणात येण्यापूर्वी ते काय करत होते. चला तर मग जाणून घेऊया शहजाद पूनावाला यांचे शिक्षण किती झाले आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या पदव्या आहेत.

कोण आहेत शहजाद पूनावाला?

शहजाद पूनावाला यांचा जन्म १९८७ मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही पुण्यातच झाले. ते प्रदीर्घ काळ राजकारणात आणि टीव्ही डिबेट्समध्ये सक्रिय असणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक राहिले आहेत. नुकताच त्यांनी वैयक्तिक कारणांचे स्पष्टीकरण देत भाजपचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

शहजाद पूनावाला यांचे शिक्षण कुठेपर्यंत झाले आहे?

शालेय शिक्षण: शहजाद पूनावाला यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मधून पूर्ण केले.

पदवी : यानंतर त्यांनी नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स मधून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली.

कायदा : पुढे जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकिलीची पदवी मिळवली.

विशेष कोर्स: याव्यतिरिक्त त्यांनी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथून राजकारण, प्रशासन आणि गव्हर्नन्सशी संबंधित एक विशेष कोर्सही केला.

अभ्यासादरम्यानच त्यांचा रस सार्वजनिक मुद्दे, वादविवाद आणि विद्यार्थी राजकारणात वाढू लागला होता.

NEET Updates: पेपर लीकच्या अफवांपासून सावध राहा! केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे विद्यार्थ्यांना मोठे आवाहन

राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे?

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी शहजाद पूनावाला यांनी वकील म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयासोबत देखील काम केले. या काळात ते नागरी हक्कांशी संबंधित मुद्द्यांवरही सक्रिय राहिले.

भाजपमध्ये कधी झाला प्रवेश?

सुमारे चार वर्षे काँग्रेसपासून दूर राहिल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये शहजाद पूनावाला अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाले. पक्षात आल्यानंतर काही काळातच त्यांना राष्ट्रीय प्रवक्ते बनवण्यात आले. यानंतर ते टीव्ही डिबेट, पत्रकार परिषदा आणि सोशल मीडियावर भाजपची बाजू मांडणारे प्रमुख चेहरे बनले. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्याकडे भाजपच्या दिल्ली युनिटच्या आयटी आणि सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती.

Job & Salary Trends: आता मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ‘या’ शहरांमध्ये झपाट्याने वाढतोय पगार; टीमलीजचा अहवाल जाहीर

शहजाद पूनावाला यांच्याकडे कोणकोणत्या पदव्या आहेत?

बी.कॉम : बॅचलर ऑफ कॉमर्स

एलएल.बी : बॅचलर ऑफ लॉ

गव्हर्नन्स डिप्लोमा/कोर्स: एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथून राजकारण आणि प्रशासनाचा विशेष अभ्यासक्रम.

Web Title: Shehzad poonawalla resigns bjp education qualification career details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • BJP
  • education

संबंधित बातम्या

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
1

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
2

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
3

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
4

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.