फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Sindhudurg District Central Co-op. Bank Ltd) अंतर्गत ‘शिपाई’ या संवर्गातील एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर या भरती एजन्सीमार्फत पार पाडली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन स्वरुपात अर्ज करू शकतात. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची याच तारखेपर्यंत अंतिम मुदत आहे.या भरतीसाठी ६००/- रुपये परीक्षा शुल्क असून ते नॉन-रिफंडेबल आहे. शुल्क केवळ ऑनलाईन पेमेंट मोडद्वारेच भरावयाचे आहे. उमेदवार ०२ सप्टेंबर २०२६ ते ०५ सप्टेंबर २०२६ दरम्यान लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. लेखी परीक्षा दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी ऑफलाईन माध्यमातून होईल.
शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचा किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि इतर शैक्षणिक माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २१ ते ४० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. (३० ऑगस्ट २००५ नंतरचा व ३० ऑगस्ट १९८६ पूर्वीच्या जन्मतारखेच्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही).
अधिवास: उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक असून, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र शैक्षणिक कागदपत्रांसोबत अपलोड करणे अनिवार्य आहे.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने (Pen and Paper Mode) घेतली जाईल. लेखी परीक्षा ७० गुणांची असून कालावधी ७५ मिनिटांचा असेल. परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सहकार, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषा ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि १:३ प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांची ३० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाईल.
Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा
इच्छुक उमेदवारांनी असोसिएशनच्या www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क सादर करावेत. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीविषयीची सविस्तर नियमावली आणि अटींसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.






