Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

Software Engineer Layoffs: AI आणि IT क्षेत्रातील नोकऱ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर Redditवरील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची पोस्ट चर्चेत आली आहे. विशीच्या शेवटच्या वर्षातील या तरुणाला एका वर्षात दोन वेळा नोकरी गमवावी लागली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 25, 2026 | 01:20 PM
Software Engineer Layoffs: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Software Engineer Layoffs: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Redditवरील सॉफ्टवेअर इंजिनिअरला एका वर्षात दोनदा नोकरी गमवावी लागली.
  • खर्च कपात आणि टीमच्या पुनर्रचनेमुळे दुसरी नोकरी गेल्याचे त्याने सांगितले.
  • AI मुळे IT क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होत असल्याची चिंता त्याने पोस्टमधून व्यक्त केली.
सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणजे भारी पगार, चांगलं आयुष्य असं सगळ्यांना वाटायचं. पण आता चित्र पूर्ण बदललं आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आली आणि सगळ्या IT वाल्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशीच एक कहाणी सध्या रेडिटवर व्हायरल होतेय.

एका विशीच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या पोराने आपली व्यथा मांडली आहे. त्याला एकाच वर्षात दोन वेळा नोकरीवरून काढून टाकलं आहे. आणि आता त्याला प्रश्न पडलाय की सॉफ्टवेअर फिल्डमध्येच राहायचं की दुसरं काहीतरी करायचं. Software Engineer Layoffs:

काय आहे त्याची पोस्ट?

त्याने रेडिटवर पोस्ट टाकली होती, त्याचं टायटलच होतं “आज परत नोकरी गेली. एका वर्षात दुसऱ्यांदा. मी आता माझ्या भविष्याचा विचार करतोय.”

तो लिहितो की, गेल्या वर्षाच्या शेवटी त्याला पहिल्या कंपनीतून काढलं मग अनेक महिने तो नोकरी शोधत होता. 6 महिन्यानंतर कसंतरी त्याला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याला वाटलं चला आता सगळं ठीक होतंय. नवीन कंपनीत जॉईन झाला, काम पण चांगलं करत होता. पण अडीच महिन्यातच परत त्याला काढून टाकलं. त्याच्यासोबत अजून बऱ्याच लोकांना पण काढलं.

कंपनीने कारण काय दिलं? तर काही कामात गडबड केली म्हणून नाही, तर खर्च कमी करायचा आहे आणि टीमची रचना बदलत आहे म्हणून काढलं. म्हणजे त्याची काही चूक नसताना पण नोकरी गेली.या दोन वेळच्या धक्क्याने तो पूर्ण खचून गेला आहे. त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये आता काही भविष्य आहे का असा प्रश्न त्याला पडला आहे.

मी खूप खचलोय

तो पुढे लिहितो, मी काही श्रीमंत घरातला नाही. मला महिनाभर घरी बसून राहणं किंवा वेगवेगळ्या करिअरमध्ये ट्राय करणं परवडणार नाही. पोटासाठी आणि करिअरसाठी मला माझं गाव सोडून जिथे नोकरी मिळेल तिथे जावं लागलं. आणि आता परत नोकरी गेल्यावर मी याच रस्त्यावर चालत राहू का असा विचार करतोय.

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

तो म्हणतो AI चा परिणाम मला खूप जवळून जाणवतोय. AI ने सगळ्या डेव्हलपरची जागा घेतली आहे असं नाही, पण कंपन्या आता फक्त AI, प्रोडक्टिव्हिटी आणि खर्च कमी करण्याचाच विचार करत आहेत. त्यामुळे आधीच नोकरी टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांना तर खूपच टेन्शन आलं आहे.

शेवटी तो म्हणतो मला सहानुभूती नको आहे, मला फक्त सल्ला हवा आहे. ज्यांनी असं काही अनुभवलं आहे त्यांनी मला सांगा मी पुढे काय करू. मी सध्या पूर्णपणे खचलो आहे आणि पुढे कोणत्या दिशेला जाऊ हेच कळत नाहीये.

लोकांनी काय सल्ला दिला?

त्याच्या या पोस्टवर खूप लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी आपले पण असेच अनुभव सांगितले.एक जण म्हणाला, गेल्या 6 वर्षात मला 3 वेळा काढलं आहे. दोन वेळा मला चांगले पैसे मिळाले. आता तर नोकरीवरून काढणं हे खूप कॉमन झालं आहे. टेन्शन घेऊ नकोस.

दुसरा म्हणाला, तू विशीत आहेस, सरकारी नोकरीचा विचार कर. यात तुझ्या स्किलचा काही संबंध नाही. आता मार्केटच खराब आहे, सगळे फ्रीलान्सिंगकडे वळत आहेत.

तिसरा म्हणाला, दोन कंपन्यांच्या निर्णयामुळे तुझं करिअर ठरवू नकोस. रेझ्युमे अपडेट कर आणि परत नोकऱ्या शोधायला सुरुवात कर.

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

एका माणसाने तर फक्त एवढंच लिहिलं, मी तुला काही सल्ला देणार नाही, पण तू हे आधीही केलंस आणि परत पण करशील. तुला शुभेच्छा.बघा, ही फक्त एका पोराची गोष्ट नाही. आजकाल IT मध्ये अनेकांची हीच परिस्थिती आहे. AI मुळे खरंच नोकऱ्या जात आहेत का हा मोठा प्रश्न आहे

Web Title: Software engineer laid off twice in one year reddit viral post ai job concerns1340296

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • layoffs

संबंधित बातम्या

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
1

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
2

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

IT क्षेत्रात मोठा धक्का! Oracle ने भारतातील 30000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; Severance Pay वरही मर्यादा
3

IT क्षेत्रात मोठा धक्का! Oracle ने भारतातील 30000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; Severance Pay वरही मर्यादा

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.