BPSC TRE 4.0: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया) BPSC TRE 4.0: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एकदम भारी बातमी आहे. बिहार लोकसेवा आयोग म्हणजेच BPSC ने शिक्षक भरतीची मोठी जाहिरात काढली आहे. शालेय शिक्षक भरती परीक्षा TRE 4.0 च्या चौथ्या टप्प्यात तब्बल 32,388 जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती बिहारच्या सरकारी शाळांसाठी आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. पात्र असणारे उमेदवार BPSC च्या bpsc.bihar.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. BPSC TRE 4.0 Recruitment 2026:
BPSC ने यासाठी जाहिरात क्रमांक 15/2026 काढला आहे. याची पूर्ण माहिती आयोगाच्या साईटवर टाकली आहे.ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार? तर अर्ज भरण्याची प्रोसेस 25 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. आणि शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2026 आहे. तुम्हाला जवळपास एक महिना वेळ मिळणार आहे. फी भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. आधी फी भरा आणि मग फॉर्म भरा, नाहीतर शेवटच्या दिवशी गडबड होईल.
ही भरती खूप मोठी आहे, त्यामुळे स्पर्धा पण जास्त असणार आहे. ज्यांचं B.Ed, D.El.Ed झालं आहे आणि जे पात्र आहेत त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नका. 25 सप्टेंबर पासून फॉर्म सुरू झालेत, लवकरात लवकर भरून टाका.






