फोटो सौजन्य - Social Media
एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर) ने सलग दुसऱ्या वर्षी फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट (एफटी एमआयएम) ग्लोबल रँकिंगमध्ये भारतातील अव्वल बिझनेस स्कूल म्हणून मान्यता मिळवली आहे. जागतिक स्तरावर एसपीजेआयएमआरला ३५वे स्थान प्राप्त झाले आहे, ज्यामुळे ते देशातील आघाडीच्या व्यवस्थापन संस्था म्हणून ओळखले जाते.
सलग पाचव्या वर्षी हे यश संपादित करण्यात आले आहे, जेथे एसपीजेआयएमआरला जगातील टॉप ५० बिझनेस स्कूल्समध्ये स्थान मिळाले आहे, तसेच सलग दुसऱ्या वर्षी भारतातील अव्वल क्रमांकाचे स्कूल म्हणून सन्मान मिळाला आहे. एसपीजेआयएमआर जागतिक स्तरावरील टॉप ५० बिझनेस स्कूल्समध्ये सामील असलेल्या फक्त तीन भारतीय संस्थांपैकी एक आहे. एसपीजेआयएमआरने ३९व्या व ४१व्या स्थानावर असलेल्या अनुक्रमे आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बेंगळुरूला मागे टाकत आपल्या दोन-वर्ष पूर्ण-वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम)साठी जागतिक स्तरावर ३५वे स्थान सुनिश्चित केले.
हे देखील वाचा : IOB Apprentices भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज
फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट २०२४ रँकिंगमध्ये भारतातील टॉप बिझनेस स्कूल म्हणून मान्यता मिळण्याबाबत एसपीजेआयएमआरचे डीन डॉ. वरूण नागराज म्हणाले, “या सन्मानामधून ‘वाइज इनोव्हेशन’ला प्रगत करत व्यवसाय आणि समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. जगातील टॉप ५० बिझनेस स्कूल्समधील आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीमधून आमची फॅकल्टी व व्यावसायिक कर्मचाऱ्यांची समर्पितता, आमच्या माजी विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी आणि आम्ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग, सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक संस्थांसोबत केलेले सहयोग निदर्शनास येतात. हा सन्मान आम्हाला सर्वोत्तमतेच्या मर्यादांना दूर करण्यास प्रेरित करतो, ज्यामधून आमचे पदवीधर सर्वोत्तम विश्वाला आकार देण्यासाठी उत्तमरित्या सुसज्ज असण्याची खात्री मिळते.”
एफटी एमआयएम रँकिंग एएसीएसबी किंवा इक्यूयूआयएसद्वारे मान्यताकृत, मर्यादित किंवा कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या सहभागींसाठी डिझाइन करण्यात आलेल्या स्कूल्समधील प्रोग्राम्सचे मूल्यांकन करते. हे रँकिंग विशिष्ट निकषांवर आधारित आहे, जसे ‘अॅल्युम्नी करिअर प्रोग्रेस’, जे प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या यशावर लक्ष केंद्रित करते, ‘स्कूल डायव्हर्सिटी’, जे संस्थेमधील सर्वसमावेशकता व वैविध्यतेचे मूल्यांकन करते, ‘इंटरनॅशनल एक्स्पेरिअन्स अँड रिसर्च’, जे जागतिक एक्स्पोजर व संशोधन योगदानांना दाखवते आणि ‘करिअर सर्विसेस्’.
उल्लेखनीय बाब म्हणजे, एसपीजेआयएमआरने जागतिक रँकिंगमधील ‘करिअर सर्विस’ श्रेणीमध्ये प्रतिष्ठित सातवे स्थान संपादित केले, ज्यामधून विद्यार्थी प्लेसमेंट्सला साह्य करण्यामध्ये आणि पदवीधरांना अपवादात्मक करिअर संधी देण्यामध्ये त्यांची सर्वोत्तमता दिसून येते.
एसपीजेआयएमआरची जागतिक ओळख
एसपीजेआयएमआरचे डीन डॉ. वरुण नागराज यांनी संस्थेच्या या यशाचा उल्लेख करताना सांगितले की, “ही मान्यता आमच्या फॅकल्टी, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते.”
अधिक माहितीसाठी भेट द्या: [एसपीजेआयएमआर वेबसाइट](https://www.spjimr.org/)