फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)ने काही दिवसांपूर्वी एका भरती प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार होती. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. एकंदरीत, एकूण ५५० रिक्त जागेंवर उमेदवारांची अप्रेंटीस म्हणून नियुक्ती केली जाणार होती. अखेर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीला पूर्ण विराम लागण्याचा दिवस उजाडला आहे.
हे देखील वाचा : भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरतीला सुरुवात; अधिकृत अधिसूचना जाहीर
उमेदवारांना १० सप्टेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. आज अर्ज करण्याची विंडो बंद करण्यात येईल. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी होती. महत्वाचे म्हणजे अनेक उमेदवारांनी आपला अर्ज नोंदवत या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेऊ इच्छुक आहात तर अद्याप मुदत संपलेली नाही. आताही तुम्ही लवकर जाऊन अर्ज करू शकता.परंतु, घाई अपेक्षित आहे. वेळ गेल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केले नाही परंतु अर्ज करण्याची इच्छा आहे, असे उमेदवार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या www.iob.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज नोंदवू शकतात. अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा तसेच उमेदवाराला स्थानिक भाषेचे समाज तसेच ज्ञान असावे. स्थानिक भाषेमध्ये लिहण्याचे, वाचण्याचे तसेच बोलण्याचे कौशल्य असणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती अधिक सोपी होईल.. अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आहे तर कमाल वय २८ वर्षे इतके आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमार्यादेमध्ये सूट देण्यात येईल.
हे देखील वाचा : Jute कॉर्पोरेशनने अधिसूचना केली जाहीर; १२ उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षित प्रवर्गाना अर्ज शुल्कामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ९४४ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तर SC /ST प्रवर्गातील तसेच महिला उमेदवारांना ७०८ रुपये भरावे लागणार आहे. PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना ४७२ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवारांना अर्ज शुल्काची रक्कम १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत भरता येणार आहे. ही रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे.