Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा

सोशल मीडियावरून एनसीईआरटीची पुस्तके डाऊनलोड करताय? सावधान! एनसीईआरटीने बनावट आणि पायरसी केलेल्या पुस्तकांबाबत विद्यार्थी आणि पालकांना सतर्कतेचा मोठा इशारा दिला असून अधिकृत वेबसाईट वापरण्याचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 26, 2026 | 08:48 PM
विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा
Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांनो सावधान!
  • सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’
  • NCERT चा मोठा इशारा
जर तुम्ही राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटी (NCERT) च्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पुस्तकांची वाट पाहत असाल आणि ती सोशल मीडिया, अनधिकृत वेबसाईट किंवा एखाद्या मेसेजिंग ग्रुपवरून पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करत असाल, तर सावधान! एनसीईआरटीने बनावट, अनधिकृत आणि पायरसी केलेल्या पुस्तकांबाबत (Fake & Pirated Books) देशव्यापी जाहीर इशारा दिला आहे. इंटरनेटवर फिरत असलेल्या अशा बनावट पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांची मोठी दिशाभूल होऊ शकते, अशी भीती परिषदेने व्यक्त केली आहे.

इयत्ता ९ वीच्या पुस्तकाची बनावट प्रत सोशल मीडियावर व्हायरल!

एनसीईआरटीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंटरनेटवर परिषदेच्या अनेक पुस्तकांच्या अनधिकृत आणि बनावट प्रति वेगाने प्रसारित केल्या जात आहेत. नुकताच इयत्ता ९ वीच्या सामाजिक विज्ञान (Social Science) विषयाच्या एका बनावट पुस्तकाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकारावर स्पष्टीकरण देताना एनसीईआरटीने सांगितले की, “व्हायरल होत असलेल्या या पुस्तकाचा आणि एनसीईआरटीच्या अधिकृत प्रकाशनाचा कोणताही संबंध नाही. असे असतानाही, काही वेबसाईट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे पुस्तक ‘असली’ असल्याचे भासवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.”

𝐁𝐞𝐰𝐚𝐫𝐞 𝐨𝐟 𝐅𝐚𝐤𝐞 𝐚𝐧𝐝 𝐏𝐢𝐫𝐚𝐭𝐞𝐝 𝐍𝐂𝐄𝐑𝐓 𝐓𝐞𝐱𝐭𝐛𝐨𝐨𝐤𝐬 NCERT has noticed the circulation of unauthorized and pirated copies of its textbooks in print and digital formats. A fake version of the 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 𝐈𝐗 𝐒𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐏𝐚𝐫𝐭 𝟏… pic.twitter.com/Ep3FfOmO8M — NCERT (@ncert) June 24, 2026

अपूर्ण आणि चुकीची माहिती असण्याचा मोठा धोका

एनसीईआरटीने स्पष्ट केले आहे की, बोर्डाची सर्व पुस्तके केवळ अधिकृत माध्यमातूनच प्रकाशित आणि वितरित केली जातात. कोणत्याही पुस्तकाचे अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी ते सार्वजनिकरित्या शेअर करण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत स्रोतांवर उपलब्ध असलेली सामग्री ही अधूरी, चुकीची, बदल केलेली किंवा पूर्णपणे बनावट असू शकते. अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि परीक्षेच्या तयारीवर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत डिजिटल स्रोतांचा किंवा मान्यताप्राप्त विक्रेत्यांचाच आधार घ्यावा, असे आवाहन परिषदेने केले आहे.

CBSE 10वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; कुठे आणि कसा चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पायरसी करणाऱ्यांवर होणार कडक कायदेशीर कारवाई!

पुस्तकांच्या पायरसीविरोधात कठोर भूमिका घेत एनसीईआरटीने कडक इशारा दिला आहे. परिषदेच्या परवानगीशिवाय कोणत्याही कॉपीराइट सामग्रीची छपाई करणे, ती पुन्हा प्रकाशित करणे, वितरण करणे किंवा डिजिटल स्वरूपात शेअर करणे हा कॉपीराइट ॲक्ट १९५७ नुसार दंडनीय कायदेशीर गुन्हा आहे. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणि बनावट पुस्तके पसरवणाऱ्या घटकांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले.

इयत्ता ६ वीच्या ‘कृष्णा’ पाठ्यपुस्तकावरील वाद आणि NCERT चे स्पष्टीकरण

दरम्यान, इयत्ता ६ वीच्या ‘कृष्णा’ या कन्नड पाठ्यपुस्तकावरून एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. काही संघटनांनी या पुस्तकात विशिष्ट धार्मिक संदर्भ आणि शाकाहाराला अवाजवी प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. तथापि, एनसीईआरटीने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या पुस्तकाचे नाव कोणत्याही धार्मिक संदर्भावरून नसून, कर्नाटक राज्याची जीवनवाहिनी असलेल्या ‘कृष्णा नदी’वर आधारित आहे. तसेच, या पाठात कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा प्रसार नसून, केवळ लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या संतुलित आहाराची शास्त्रीय माहिती देण्यात आली असल्याचे एनसीईआरटीने स्पष्ट केले.

Ketan Murder Case उघडकीस आणणारे संदीप सिंग आहेत कोण? प्रोफेसर पद सोडून IPS बनले, UPSC मध्ये 143 वी रँकिंग…

Web Title: Students books downloaded from social media could be fake a major warning from ncert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
1

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
2

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
3

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.