केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इइयत्ता १०वी द्वितीय (10 th Board Second Exam) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ही परीक्षा १५ ते २१ मे दरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेत बसण्यासाठी ६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मंडळाने अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर केलेला नाही, परंतु वृत्तानुसार, सीबीएसई १०वीचा निकाल २०२६ जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यावर, विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन तपासू शकतील आणि तात्पुरती गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये नेमके कशाचे शिक्षण दिले जाते? सविस्तरपणे जाणून घ्या
सीबीएसई अधिकृत वेबसाइट – cbse.gov.in
सीबीएसई निकाल पोर्टल – cbseresults.nic.in
डिजीलॉकर digilocker.gov.in
उमंग अॅप UMANG App
निकाल जाहीर होण्याच्या वेळेस वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक असल्यामुळे, साईट हळू चालू शकते. विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही समस्या जाणवल्यास, त्यांनी थोडा वेळ थांबावे किंवा डिजीलॉकर (DigiLocker) किंवा उमंग ॲप (Umang app) यांसारख्या इतर माध्यमांद्वारे आपला निकाल तपासावा.निकालामध्ये कोणती माहिती तपासावी?
CBSE दहावी द्वितीय बोर्ड निकाल २०२६ जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. काही चूक आढळल्यास,विद्यार्थी त्यांच्या शाळेशी संपर्क साधू शकतात.
BTech vs MBBS : करिअरची मोठी दुविधा! AIच्या काळात BTech आणि MBBS पैकी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर?






