Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम! आरोग्य क्षेत्रासाठी कौशल्यांचे बळ

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्रात आरटी-पीसीआर विषयावरील दोन आठवड्यांचा ऑन-द-जॉब प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब : विद्यार्थ्यांना आधुनिक आण्विक जीवशास्त्रातील प्रगत ज्ञान आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने रिअल-टाइम पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) विषयावरील दोन आठवड्यांचा ऑन-द-जॉब ट्रेनिंग या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच संशोधन संस्था, आरोग्यसेवा आणि जैवतंत्रज्ञान उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील अपेक्षांनुसार आवश्यक व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

Chennai Colleges Co-Education: १०० वर्षापूर्वीची परंपरा बदलली! ‘या’ मुलांच्या कॉलेजचे दरवाजे आता मुलींसाठीही उघडले

या उपक्रमाअंतर्गत विविध नामांकित संशोधन संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी डीएनए/आरएनए निष्कर्षण व गुणवत्तेचे परीक्षण, पीसीआर व आरटी-पीसीआर तत्त्वे, प्रायमर व प्रोब डिझाइन, क्वांटिटेटिव्ह पीसीआर डेटा विश्लेषण, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी, सूक्ष्मजीव संवर्धन, आण्विक निदान, जीन अभिव्यक्ती विश्लेषण आणि पर्यावरणीय आण्विक जीवशास्त्र या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यापक प्रयोगशाळा प्रशिक्षण हे होते. विद्यार्थ्यांनी माध्यम तयार करणे, सूक्ष्मजीव संवर्धन, डीएनए/आरएनए निष्कर्षण, न्यूक्लिक अॅसिडचे परिमाण मोजणे, स्वयंचलित डीएनए निष्कर्षण प्रणाली, पारंपरिक पीसीआर, आरटी-पीसीआर, फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी, प्रतिमा विश्लेषण सॉफ्टवेअर आणि आरटी-पीसीआर डेटाचे विश्लेषण यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याशिवाय प्रयोगांचे नियोजन, दूषितीकरण नियंत्रण, गुणवत्ता हमी आणि प्रयोगशाळेतील मानक कार्यपद्धती यांचेही प्रशिक्षण देण्यात आले.

Sripati Civil Judge: मुलीच्या जन्मानंतर अवघ्या २ दिवसांत दिली परीक्षा; २३ व्या वर्षी ‘सिव्हिल जज’ बनून श्रीपतीने रचला इतिहास!

विद्यार्थ्यांनी दिला प्रशिक्षणाचा अनुभव

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षणाचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा असल्याचे सांगितले. वझे-केळकर महाविद्यालयातील एम.एस्सी. प्राणिशास्त्र शाखेची विद्यार्थिनी थंगाज्योती, मुंबई विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील घाना येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी लॅम्पसन डकारे, जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थिनी मरियम खान आणि एसआरएम विद्यापीठ चेन्नई येथील अदिती पटेल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नवी मुंबई येथील अनुष्का जोंधळे आणि दिपाली सातपुते तसेच एचएसएनसी विद्यापीठ मुंबई येथील रौनक त्रिपाठी यांनी सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रयोगांचा अनुभव, आधुनिक उपकरणांचा वापर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे संशोधन क्षेत्रातील आत्मविश्वास आणि कौशल्ये अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त केली.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, लस व औषध विकास, जीनोमिक्स, पर्यावरणीय व कृषी जैवतंत्रज्ञान, न्यायवैद्यक, क्लिनिकल डायग्नोस्टिक्स तसेच औद्योगिक संशोधन व विकास या क्षेत्रांमध्ये करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील

उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच आरटी-पीसीआर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान क्षेत्रातील बदलत्या गरजांशी सुसंगत बनवत असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे केंद्राचे ध्येय असल्याचे राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. पूजा सेवक, प्रमुख संशोधक (क्रिटीकल मेटल बायोमायनिंग प्रोजेक्ट) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, अंमलबजावणी आणि तांत्रिक समन्वय करण्यात आले.

Web Title: Successful initiative for state of the art rt pcr training at mumbai university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Mumbai University

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.