
फोटो सौजन्य - Social Media
शिक्षक या व्यवसायात काम करणे हे स्वतःतच एक प्रतिष्ठेचं कार्य असतं, आणि जर एखाद्या मोठ्या संस्थेत शिकवण्याची संधी मिळाली, तर ती खरोखरच अभिमानाची बाब असते. अशा शिक्षकांसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई ने असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती लेबर मार्केट रिसर्च फेसिलिटी (LMRF), स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड लेबर स्टडीज या विभागासाठी करण्यात येत आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑफिशियल संकेतस्थळ tiss.ac.in वरून अर्ज करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे, NET पात्रता नसलेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे पद क्रमांक एक साठी जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर तुम्ही मॅनेजमेंट किंवा संबंधित क्षेत्रातील माशा डिग्री किमान 55% गुणांसह संबंधित विषयात पीएचडी असणे आवश्यक ठरणार आहे. तर पद क्रमांक दोन साठी स्टॅटिस्टिक्स ऑपरेशन रिसर्च इकॉनॉमिक्स किंवा डेमोग्राफी मास्टर डिग्री किमान 55% गुणांचा आणि त्याच विषयात पीएचडी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. तसेच अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे सर्वसाधारण उमेदवार एक हजार रुपये अर्ज शुल्क म्हणून भरणार आहेत तर मागास प्रवर्गातून येणारा उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. महिला उमेदवारांकडून कोणत्या प्रकारच्या अर्ज स्वीकारण्यात येणार नाही नाहीत.
अर्ज प्रक्रिया:
ही भरती कराराधारित (Contractual) स्वरूपात करण्यात येणार आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही TISS सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे.