फोटो सौजन्य - Social Media
जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव येथे भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पण पोलीस शिपाई म्हणजेच कॉन्स्टेबल पदासाठी हे भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 171 जागा भरण्यात येणार आहेत. तर ही भरती फक्त जळगावत नसून संपूर्ण महाराष्ट्राभरात राबवण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी भरतीचा आकडा म्हणजेच रिक्त जागांचा आकडा 15631 इतका आहे. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांना Mahapolice.gov.in किंवा policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी लागणार आहे. येथेच अर्ज सादर करता येणार आहे. या भरतीच्या अंतर्गत महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक तसेच अर्धवेळ पदवीधर आणि पोलीस पाल्यासाठी राखीव प्रवर्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गृहा रक्षक आणि अनाथ प्रवर्गासाठी ही राखीव जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उमेदवारांना अर्ज करताना काही सूचना लक्षात घ्यावा लागणार आहेत. अर्ज करण्या अगोदर जाहीर करण्यात आलेल्या अटी तसेच शर्ती नेट वाचाव्यात. आपण जे अर्ज करत आहोत त्यात त्रुटी नसाव्यात जर असल्या तर बाद होणाऱ्या अर्जाला सर्वस्वी आपण जबाबदार! निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश असून पहिला टप्प्यात 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार तसेच दुसरा टप्पा 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल. या संधीचे महत्त्व म्हणजे खातीवर्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि पोलीस दलात सामील होण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
महत्त्वाची माहिती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरात ही भरती राबवण्यात येत आहे त्यामुळे आपापल्या जिल्ह्याची नोंद जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत निश्चित असेल. जर तुम्ही त्या भरतीसाठी इच्छुक असाल तर कसलाही वेळ न लावता ताबडतोब अर्ज करण्यात यावा आणि नियुक्त होण्याच्या संधीचा लाभ घेण्यात यावा.






