Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणार! शिक्षक पदभरतीत सर्वाधिक गुणधारकांनाच मिळणार प्राधान्य

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने मोठा बदल केला आहे. आता सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्तीत प्राधान्य दिले जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 05, 2026 | 05:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करताना आता सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. या निर्णयामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड होऊन शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे ‘पवित्र’ पोर्टलमार्फत भरती करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला होता. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राबविण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होणे आवश्यक असल्याचे न्यायालयानेही अधोरेखित केले होते.

मात्र, विद्यमान गुणांकन पद्धतीत सर्व उमेदवारांचे योग्य मूल्यमापन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन व्हावे आणि सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड निश्चित व्हावी, यासाठी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे संस्थांना अधिक योग्य उमेदवार निवडण्यास मदत होणार आहे.

शासनाच्या २ एप्रिल २०२६ च्या आदेशानुसार, १०० गुणांच्या सुधारित गुणांकन पद्धतीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती करणे बंधनकारक राहील. जर दोन उमेदवारांना समान गुण मिळाले, तर ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे त्याला प्राधान्य दिले जाईल. वयही समान असल्यास बारावीतील गुणांचा विचार करण्यात येईल. या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्यावर देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

UPSC : पूर्वपरीक्षेनंतर उत्तरपत्रिका होणार प्रसिद्ध! पारदर्शकतेच्या मागणीला प्रतिसाद

सध्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय अशा दोन पर्यायांपैकी एक निवडण्याची मुभा आहे. मुलाखतीसह पर्याय निवडल्यास १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातात. यानंतर निश्चित मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून, त्यातून योग्य उमेदवारांची निवड करणे अपेक्षित आहे. एकंदरीत, या नव्या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्ताधारित होणार असून, त्याचा थेट सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.

Web Title: The quality of school education set to rise priority in teacher recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
2

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
3

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
4

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.