Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या परीक्षा शुल्क माफी योजनेवरून आता वाद निर्माण झाला आहे. शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अनेक गरजू विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 02:11 PM
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी जाहीर
  • जाचक अटींमुळे अनेक विद्यार्थी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता
  • अटी रद्द करून सरसकट शुल्क माफी देण्याची मागणी
पुणे : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या परीक्षा शुल्क माफी योजनेवरून आता वाद निर्माण झाला आहे. शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अनेक गरजू विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या अटी तातडीने रद्द करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.

 

राज्यात यंदा तब्बल ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार विभागांतर्गत येणाऱ्या कला परिसंस्थांमधील विद्यार्थ्यांचे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने २० लाख ३८ हजार ६३० रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. मात्र, शुल्क माफीसाठी घालण्यात आलेल्या अटींवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. शासन निर्णयानुसार, ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रत्यक्ष शहरात राहतात, मात्र त्यांच्या नावावर गावाकडे शेतजमीन आहे, अशा विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.

या अटीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. दुष्काळामुळे गावाकडील शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर करावे लागते. अशा परिस्थितीत केवळ पालक शहरात राहतात आणि त्यांच्या नावावर शेतजमीन आहे, या कारणावरून विद्यार्थ्यांना शुल्क माफी नाकारणे योग्य नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे. दुष्काळाचा आर्थिक फटका बसलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने अटींचा फेरविचार करून दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना कोणताही भेदभाव न करता परीक्षा शुल्क माफीचा लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा : एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज्य सरकारने किती तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे?

    Ans: राज्य सरकारने यंदा ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

  • Que: परीक्षा शुल्क माफीचा निर्णय कोणत्या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आला आहे?

    Ans: २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी कला परिसंस्थांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Que: विद्यार्थी आणि संघटनांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: परीक्षा शुल्क माफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट शुल्क माफी द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: There is a demand for a blanket waiver of examination fees for students from drought affected areas nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • Students

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या खुर्चीवरून महायुतीत सत्तासंघर्षाची चाहूल! अध्यक्षपदाचा तिढा कोण सोडवणार?
1

सातारा जिल्हा बँकेच्या खुर्चीवरून महायुतीत सत्तासंघर्षाची चाहूल! अध्यक्षपदाचा तिढा कोण सोडवणार?

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला
2

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
3

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर
4

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.