Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

दारू पाजण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी रुग्णालय परिसरातच एका रुग्णावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 12:10 PM
अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार!
  • दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर हल्ला
  • अमरावतीतील घटनेनं खळबळ
अमरावती : दारू पाजण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी रुग्णालय परिसरातच एका रुग्णावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री बडनेरा मार्गावरील महापालिकेच्या लाल दवाखान्यात हा प्रकार घडला. या हल्ल्यात ५७ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उमेश टेकचंद गोस्वामी (वय ५७, रा. सुशीलनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

 

मंगळवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्याने उमेश उपचारासाठी लाल दवाखान्यात दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन आणि औषधे दिली. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने ते रुग्णालयाच्या परिसरातच विश्रांतीसाठी झोपले होते. दरम्यान, रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास त्यांचे पूर्वपरिचित असलेले दोन तरुण तेथे आले. त्यांनी उमेश गोस्वामी यांच्याकडे दारू पाजण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यांनी दारू पाजण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणावरून दोघांना राग आला आणि त्यांनी जवळील कोयत्याने उमेश यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या खांद्याला, हाताला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर दोन्ही तरुण घटनास्थळावरून पसार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या उमेश यांना एका ऑटोचालकाने तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?

राजापेठ पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणी वीर प्रफुल्ल शेळके आणि संदीप ऊर्फ मुन्ना राजू शिंदे (दोघेही रा. दसरा मैदान झोपडपट्टी) यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी उमेश गोस्वामी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, उपचारासाठी आलेल्या रुग्णावर रुग्णालय परिसरातच अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रुग्णालय परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था असण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमरावतीमध्ये रुग्णावर कोयत्याने हल्ला का करण्यात आला?

    Ans: दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून दोन तरुणांनी उमेश गोस्वामी यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती आहे.

  • Que: हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: उमेश टेकचंद गोस्वामी (वय ५७, रा. सुशीलनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

  • Que: या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: वीर प्रफुल्ल शेळके आणि संदीप ऊर्फ मुन्ना राजू शिंदे यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred in amravati where a patient was attacked on hospital premises nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
1

दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
2

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

एका अक्षराच्या चुकीमुळे ‘या’ गावातील शेतकरी दिवाळी मदतीपासून वंचित; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
3

एका अक्षराच्या चुकीमुळे ‘या’ गावातील शेतकरी दिवाळी मदतीपासून वंचित; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक
4

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.