Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन!ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी!

टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 10, 2026 | 05:37 PM
टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन!ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी!
Follow Us
Follow Us:

मुंबई, १० जून २०२६:टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

नवीन स्थापन केलेले प्रशिक्षण केंद्र सीएसएमएसएस संस्थेचे अध्यक्ष रंजीत पी. मुलाय, सचिव पद्माकर एच. मुलाय, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जी. देशमुख, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शशिकांत आर. डिकले, सीएसएमएसएस छ. शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गणेश बी. डोंगरे, शरयू टोयोटाचे संचालक नसीर मानेर तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योगातील अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’, भारत आणि जपानच्या ऑटो क्षेत्रातील संयुक्त उपक्रमाची वाटचाल

टी-टीईपी अभ्यासक्रमात शैक्षणिक शिक्षणासोबत टोयोटा डीलरशिपमध्ये इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये सर्व्हिस अॅडव्हायझर आणि सेल्स कन्सल्टंट या प्रवाहांवर विशेष भर दिला जात आहे, ज्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सहा तांत्रिक शाखांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि वार्षिक 480 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. केंद्रात आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असून त्यात इंजिन मॉडेल्स, घटकांचे कट-सेक्शन, सिम्युलेटर आणि साधने आहेत. या सर्व सुविधा टोयोटाच्या हायब्रिड व सर्व्हिस तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात. याशिवाय बॉडी अँड माइंड ट्रेनिंग – कल्चर डेव्हलपमेंट साहित्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.

शरयू टोयोटाचे संचालक  नासिर मणेर म्हणाले, “टी-टीईपी सुविधा ही केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक लॉन्चपॅड आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण साधन आणि स्थानिक संधी यांचा संगम करून आम्ही विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

2800 तरुणांना मिळणार रोजगार! टोयोटा किर्लोस्करचा मोठा विस्तार; बिडकीन प्लांटमध्ये दरवर्षी तयार होणार १ लाख वाहने

या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स व गव्हर्नन्स) विक्रम गुलाटी म्हणाले, “टी-टीईपी सारख्या उपक्रमांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन आत्मविश्वास, कौशल्य आणि उद्देशाने सक्षम बनवू इच्छितो. हे नवीन केंद्र, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर येथे, सर्वसमावेशक विकास साधण्याचे आणि भारताच्या कौशल्य परिसंस्थेला तळापासून बळकट करण्याचे आमचे ध्येय प्रतिबिंबित करते.”

टोयोटा किर्लोस्कर मोटरने कौशल्य विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि टी-टीईपी सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाशी संलग्न प्रशिक्षण दिले जाते. २००६ मध्ये सुरू झालेल्या टी-टीईपी कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत भारतभरात १४,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी ७०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशातील ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या आणि अधिकृत डीलरशिपमध्ये रोजगार मिळवला आहे.

Web Title: Toyota technical education program launched chhatrapti sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • toyota

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.