Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत प्रशिक्षण! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Chandrakant Patil यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘यूजी ४.०’ या ऑनलाइन अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यात केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 08, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि शैक्षणिक प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी ‘यूजी ४.०’ हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अध्यापकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) तर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘यूजी ४.०’ या सर्वसमावेशक ऑनलाइन अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ

पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीए चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एमएसएफडीए चे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक आराखड्यात मल्टीपल एन्ट्री-एक्झिट तसेच क्रेडिट-आधारित प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यापकांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरणार असून, त्यांना सक्षम करण्यासाठी एमएसएफडीए ने हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे.

हा कार्यक्रम एमएसएफडीएच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) द्वारे पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात राबविण्यात येणार असून, राज्यातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील सर्व अध्यापकांना तो सहज उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमामध्ये एकूण नऊ सविस्तर मॉड्यूल्सचा समावेश असून, प्रत्येक मॉड्युलद्वारे शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीवर टप्प्याटप्प्याने भर देण्यात येणार आहे.

SSC Result : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता! कसं करायचं चेक? जाणून घ्या

प्रत्येक मॉड्यूलचा कालावधी सुमारे ३० ते ६० मिनिटांचा ठेवण्यात आला असून, शिक्षकांना स्व-अभ्यासाच्या लवचिकतेसह प्रशिक्षण पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थात्मक तयारी, विद्यार्थी समुपदेशन आणि शैक्षणिक प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवरही या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाशी संलग्न सर्व महाविद्यालये व विद्यापीठांतील अध्यापक या कार्यक्रमासाठी पात्र असून, इच्छुकांनी एमएसएफडीएच्या एलएमएस पोर्टलवर जून महिन्यापासून नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. दरम्यान, ‘यूजी ४.०’ या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पुढील टप्प्यात अधिक प्रगत अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची योजना असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Training for teachers aligned with the evolving educational system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Career
  • chandrakant patil

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
2

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग
4

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.