Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’! जाणून घ्या ‘या’ शिक्षकांविषयी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४’ साठी देशातील ५० शिक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षक हे गडचिरोली आणि कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Sep 02, 2024 | 05:41 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४’ साठी देशातील ५० शिक्षकांची निवड केली आहे.  महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके आणि कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा समावेश आहे. या दोन्ही शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला जाणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  या देशातील ५०  शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षकदिनी  (५ सप्टेंबर)  नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करतील. या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामध्ये प्रशस्ती पत्र,  रु.५०,००० रोख बक्षीस रक्कम  आणि एक रौप्यपदक देण्यात येते.

हे देखील वाचा- मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर ! जाणून तुमची परीक्षा कधी सुरु होणार

महाराष्ट्र के दो शिक्षकों को #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार2024 से सम्मानित किया जाएगा! गडचिरोली के मंतैय्या बेडके और कोल्हापूर के सागर बगाडे को यह पुरस्कार दिल्ली में 5 सितंबर को राष्ट्रपति के हाथों से प्रदान किया जाएगा। #NationalTeacherAward #MaharashtraTeachers #ProudMoment pic.twitter.com/lcHffMEcu9 — महाराष्ट्र सूचना केंद्र (@MahaMicHindi) August 31, 2024

शिक्षक मंतैय्या बेडके 

मंतैय्या बेडके हे गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी गडचिरोलीच्या या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील शाळेत उत्कृष्ट कार्य करत विद्यार्थ्यांची पटसंख्या ८ वरून १३८ पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. ते या दुर्गम नक्षलग्रस्त भागात गेली १४ वर्षे शिक्षणाचे कार्य करत आहेत.  राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांच्या शिक्षण कार्याचा गौरव केला जाणार आहे.

हे देखील वाचा- पुण्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ! युवकांना परदेशात रोजगार संधी प्राप्त होणार

शिक्षक  सागर बागडे 

श्री. सागर बागडे गेल्या ३० वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव आहे. विशेष म्हणजे बागडे यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत. दुर्गम भागातील मुले, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची मुले यांच्या शिक्षणासाठी बागडे यांनी प्रयत्न केले आहेत.

Web Title: Two teachers from maharashtra announced national teacher award read about those teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.