Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET December 2026 Exam: UGC NET चं बिगुल वाजलं! डिसेंबर परीक्षेचं विषयानुसार वेळापत्रक जाहीर

UGC NET December 2026 Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेचे विषयानुसार वेळापत्रक जाहीर केले आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या नोटीसमध्ये परीक्षेच्या तारखा आणि सत्रांची माहिती देण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 20, 2026 | 11:50 AM
UGC NET December 2026 Exam: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

UGC NET December 2026 Exam: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.
  • १४ ते २१ डिसेंबरदरम्यान दोन सत्रांत परीक्षा.
  • मराठी विषयाची परीक्षा १६ डिसेंबरला दुपारच्या सत्रात.

NTA ने UGC NET डिसेंबर 2026 ची परीक्षा कधी होणार ते जाहीर केले. 19 नोव्हेंबर 2026 ला नोटीस काढून त्यांनी सगळं वेळापत्रक दिले. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून 14, 18, 21 डिसेंबर होईल. ही परीक्षा प्रक्रिया दोन सत्रात पूर्ण केली जाईल. सकाळची परीक्षा 9 ते 12 वाजेपर्यंत तसेच दुपारची परीक्षा 3 ते 6 वाजेपर्यंत असेल. तुम्ही कोणता फॉर्म भरलाय त्यानुसार तुमच्या परीक्षेची वेळ पाहावी. UGC NET December 2026 Exam:

14 डिसेंबर – पहिला दिवस

पहिल्या दिवशी सकाळी इतिहास, पाली, प्राकृत, बंगाली, तुलनात्मक साहित्य, संगीत, लोक प्रशासन, शिक्षण, समाजकार्य आणि मल्याळम या विषयांची परीक्षा आहे. त्याच दिवशी दुपारी कॉम्प्युटर सायन्स, पर्शियन, रशियन, गृहविज्ञान, लोकसंख्या अभ्यास, मानसशास्त्र, मैथिली, अरेबिक आणि मॅनेजमेंट या विषयांची परीक्षा होणार आहे.

15 डिसेंबर – दुसरा दिवस

दुसऱ्या दिवशी सकाळी उर्दू, गुन्हेशास्त्र, संस्कृत पारंपरिक विषय, आदिवासी आणि प्रादेशिक भाषा, लोकसाहित्य, राज्यशास्त्र, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, जपानी, डोगरी, राजस्थानी आणि इंग्रजी हे विषय आहेत. दुपारी शारीरिक शिक्षण, परफॉर्मिंग आर्ट म्हणजे नृत्य / नाट्य, आयुर्वेद जीवशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, वाणिज्य, संरक्षण अभ्यास, भारतीय संस्कृती, बौद्ध / जैन / गांधीवादी अभ्यास, भाषाशास्त्र आणि व्हिज्युअल आर्ट हे विषय असतील.

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी

16 डिसेंबर – तिसरा दिवस

तिसऱ्या दिवशी सकाळी फक्त 4 विषय आहेत. चिनी, कोकणी, स्पॅनिश आणि काश्मिरी. दुपारी म्युझिओलॉजी, पंजाबी, तमिळ, भूगोल आणि मराठी या विषयांची परीक्षा होणार आहे. मराठी वाल्यांनो, तुमची तारीख लक्षात ठेवा.

17 डिसेंबर – चौथा दिवस

या दिवशी सकाळी सगळ्यात जास्त विषय आहेत. हिंदी, अरब संस्कृती, भारतीय ज्ञान प्रणाली, मणिपुरी, कन्नड, जर्मन, सिंधी, फ्रेंच, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र, हिंदू अभ्यास आणि मानववंशशास्त्र. दुपारी कामगार कल्याण, संथाली, पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक सायन्स, महिला अभ्यास, कायदा, तेलुगू, फॉरेन्सिक सायन्स, नेपाळी, ग्रंथालय शास्त्र, तत्त्वज्ञान, आसामी, समाजशास्त्र, योग आणि पर्यटन व्यवस्थापन हे विषय आहेत.

21 डिसेंबर – शेवटचा दिवस

18 तारखेनंतर एक दिवस गॅप देऊन 21 डिसेंबरला शेवटची परीक्षा आहे. सकाळी बोडो, गुजराती, संस्कृत, आंतरराष्ट्रीय संबंध, मानवी हक्क हे विषय आहेत. दुपारी प्रौढ शिक्षण, पुरातत्त्वशास्त्र, उडिया, सामाजिक औषधशास्त्र, सांख्यिकी आणि वनीकरण या विषयांची परीक्षा होईल.

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनी काय करायचं?

परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे, हे परीक्षेच्या 21 दिवस आधी वेबसाईटवर कळवलं जाईल. त्यामुळे ugcnet.nta.nic.in ही वेबसाईट रोज चेक करत राहा. काही अडचण आली तर 011-40759000 या नंबरवर फोन करा किंवा ugcnet@nta.ac.in वर मेल करा. अॅडमिट कार्ड यायची वाट बघू नका, आतापासून अभ्यासाला लागा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षा कधी होणार आहे?

    Ans: ही परीक्षा १४, १५, १६, १७ आणि २१ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

  • Que: UGC NET परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे?

    Ans: UGC NET परीक्षा ऑनलाइन म्हणजेच CBT पद्धतीने घेतली जाणार आहे.

  • Que: UGC NET परीक्षेचे केंद्र कोणत्या शहरात आहे, हे कधी समजेल?

    Ans: परीक्षेच्या साधारण २१ दिवस आधी परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.

Web Title: Ugc net december 2026 exam schedule subject wise dates rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Entrance exam
  • Exam Schedule
  • UGC
  • UGC net

संबंधित बातम्या

Chandrakant Patil Update: प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान होणार! विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश
1

Chandrakant Patil Update: प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान होणार! विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश

Fake Universities: प्रवेश घेण्यापूर्वी सावधान! बनावट विद्यापीठांबाबत यूजीसीचा कडक इशारा; ‘या’ संकेतस्थळावर तपासा मान्यता
2

Fake Universities: प्रवेश घेण्यापूर्वी सावधान! बनावट विद्यापीठांबाबत यूजीसीचा कडक इशारा; ‘या’ संकेतस्थळावर तपासा मान्यता

Assistant Professor Recruitment: तब्बल ५,०१२ सहाय्यक प्राध्यापकांची भरती ‘या’ कारणामुळे रखडली; तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी
3

Assistant Professor Recruitment: तब्बल ५,०१२ सहाय्यक प्राध्यापकांची भरती ‘या’ कारणामुळे रखडली; तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.