Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrakant Patil Update: प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान होणार! विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश

Chandrakant Patil higher education news: नेट-सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सकारात्मक बैठक पार पडली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 19, 2026 | 10:32 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • नेट-सेट, पीएच.डी.धारकांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्रालयात सकारात्मक चर्चा
  • विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उच्चस्तरीय समित्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश
Chandrakant Patil higher education news:  नेट-सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

बैठकीत UGC च्या निर्देशांनुसार ‘समान काम, समान वेतन’ हे तत्त्व लागू करण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. तसेच सध्या प्रचलित असलेल्या तासिका तत्त्वावरील नियुक्ती पद्धतीऐवजी एकत्रित वेतनावर कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची नियुक्ती करण्याबाबत समितीच्या सदस्यांनी भूमिका मांडली. या मागण्यांचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यासाठी मा. संचालक, उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

MahaDBT scholarship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पदवी अभ्यासक्रमांनाही आता शिष्यवृत्तीचा लाभ; शासनाचा मोठा निर्णय

उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे देण्यात आले निर्देश

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार प्राध्यापकांच्या कार्यभार निश्चिती व तपासणीसंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या विषयाबाबत अनुकूलता दर्शवून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश अपर मुख्य सचिव आणि उच्च शिक्षण संचालकांना देण्यात आले. तसेच या संदर्भात उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

याशिवाय, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी निवड समितीमार्फत वापरण्यात येणारी गुणांकन पद्धती निश्चित करण्याबाबत विद्यापीठांना निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नसल्याने सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक आयोजित करून ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश मा.संचालक, उच्च शिक्षण यांना देण्यात आले.

Fake Universities: प्रवेश घेण्यापूर्वी सावधान! बनावट विद्यापीठांबाबत यूजीसीचा कडक इशारा; ‘या’ संकेतस्थळावर तपासा मान्यता

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, संचालक, उच्च शिक्षण डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नेट-सेट, पीएच.डी.धारकांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्रालयात सकारात्मक चर्चा

नेट-सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने शिष्टमंडळात डॉ. प्रमोद तांबे, डॉ. सुरेश देवढे-पाटील, प्रा. ओंकार कोरोवले आणि प्रा. अजय बनसोडे यांनी आपल्या प्रमुख मागण्यांबाबत सविस्तर भूमिका मांडली. या बैठकीमुळे नेट-सेट व पीएच.डी.धारकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडले असून, शासनस्तरावर होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे राज्यातील पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंत्रालयातील बैठकीत 'समान काम, समान वेतन' आणि सीएचबी (CHB) धोरणाबाबत काय निर्णय घेण्यात आला?

    Ans: यूजीसीच्या निर्देशांनुसार 'समान काम, समान वेतन' हे तत्त्व लागू करणे आणि तासिका तत्त्वाऐवजी एकत्रित वेतनावर कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची नियुक्ती करणे या मागण्यांचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • Que: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार प्राध्यापकांच्या कार्यभार तपासणीबाबत बैठकीत काय ठरले?

    Ans: एनईपी २०२० नुसार प्राध्यापकांच्या कार्यभार निश्चिती व तपासणीबाबत अनुकूलता दर्शवत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश अपर मुख्य सचिव आणि उच्च शिक्षण संचालकांना देण्यात आले असून, या संदर्भात उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे निर्देशही दिले आहेत.

  • Que: रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कोणते पाऊल उचलण्यात आले आहे?

    Ans: दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राध्यापक भरतीसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्याबाबत विद्यापीठांना निर्देश दिले होते. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक आयोजित करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.

Web Title: Net set phd holders pending demands mantralaya meeting chandrakant patil sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • education
  • Professor Jobs
  • UGC

संबंधित बातम्या

ZP Teachers Transfer: जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांबाबत मोठा निर्णय! रुजू न होणाऱ्या शिक्षकांवर होणार…
1

ZP Teachers Transfer: जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांबाबत मोठा निर्णय! रुजू न होणाऱ्या शिक्षकांवर होणार…

Fake Universities: प्रवेश घेण्यापूर्वी सावधान! बनावट विद्यापीठांबाबत यूजीसीचा कडक इशारा; ‘या’ संकेतस्थळावर तपासा मान्यता
2

Fake Universities: प्रवेश घेण्यापूर्वी सावधान! बनावट विद्यापीठांबाबत यूजीसीचा कडक इशारा; ‘या’ संकेतस्थळावर तपासा मान्यता

MahaDBT scholarship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पदवी अभ्यासक्रमांनाही आता शिष्यवृत्तीचा लाभ; शासनाचा मोठा निर्णय
3

MahaDBT scholarship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पदवी अभ्यासक्रमांनाही आता शिष्यवृत्तीचा लाभ; शासनाचा मोठा निर्णय

Parbhani Recruitment 2026: वैद्यकीय प्राध्यापकांसाठी मोठी संधी! तब्बल १.८५ लाखांपर्यंत मिळणार मासिक वेतन; असा करा अर्ज
4

Parbhani Recruitment 2026: वैद्यकीय प्राध्यापकांसाठी मोठी संधी! तब्बल १.८५ लाखांपर्यंत मिळणार मासिक वेतन; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.