Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप; परीक्षा पुन्हा न घेण्याच्या मागणीसाठी NTA कार्यालयावर धडक!

NTA Office Protest: युजीसी नेटच्या (UGC NET) काही विषयांच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा पुन्हा न घेण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी NTA कार्यालयात धाव घेतली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 19, 2026 | 11:58 AM
student protest

student protest

Follow Us
Follow Us:

NTA Office Protest:  युजीसी नेट (UGC NET) च्या तीन विषयांची परीक्षा रद्द केल्यानंतरही वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. परीक्षेबाबत आता विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या समोर येत आहेत. याच संदर्भात विद्यार्थी आणि शिक्षकांचे एक शिष्टमंडळ नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA च्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपल्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शिष्टमंडळाने विशेष करून अशी मागणी केली की, इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा पुन्हा घेतली जाऊ नये.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आहे. जर NTA च्या चुकीमुळे परीक्षा रद्द होत असेल, तर त्याचा फटका विद्यार्थ्यांनी का सोसावा? शिष्टमंडळाने पॉलिटिकल सायन्सच्या आन्सर की आणि रिस्पॉन्स शीटमध्येही गडबड असल्याचा आरोप केला आहे. आन्सर की मधील अनेक प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा आक्षेप असून, त्यांना आव्हान देण्यासाठी शुल्कही भरावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

NTA कार्यालयात पोहोचले विद्यार्थी आणि शिक्षक

युजीसी नेट परीक्षेसंबंधित आपल्या समस्या घेऊन काही विद्यार्थी आणि शिक्षक NTA च्या कार्यालयात गेले होते. शिष्टमंडळात समाविष्ट असलेले शिक्षक प्रद्युम्न त्रिपाठी यांनी सांगितले की, ते त्यांच्या मागण्या घेऊन NTA कडे गेले होते, पण त्यांना तिथून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक ही आहे की, इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा पुन्हा घेतली जाऊ नये. विद्यार्थ्यांनी या परीक्षेची दीर्घकाळ तयारी केली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी परीक्षा रद्द होणे आणि पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर आणि इतर परीक्षांच्या तयारीवरही परिणाम होऊ शकतो.

NTA चा मोठा निर्णय! ६०० तज्ज्ञांना हटवून परीक्षा विभागाची पुनर्रचना; परीक्षा प्रणाली होणार अधिक पारदर्शक!

विद्यार्थ्यांचा सवाल – NTA च्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगावी?

शिष्टमंडळाचे म्हणणे आहे की, जर परीक्षेमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या असेल तर त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर लादली जाऊ नये. शिक्षक प्रद्युम्न त्रिपाठी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पूर्ण मेहनतीने परीक्षा दिली आहे. अशा परिस्थितीत जर परीक्षेत कोणतीही तांत्रिक अडचण समोर आली आणि नंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यास भाग पाडणे योग्य नाही. इंग्रजी आणि कॉमर्सच्या बाबतीत असा कोणताही मार्ग काढला जावा, जेणेकरून त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

शिष्टमंडळाने पॉलिटिकल सायन्सच्या आन्सर की बाबतही आपली तक्रार NTA समोर मांडली. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, पॉलिटिकल सायन्सच्या आन्सर की मध्ये सुमारे १४-१५ प्रश्नांवर आक्षेप आहे. विद्यार्थ्यांच्या मते या प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचा दावा केला जात आहे आणि त्यांना आव्हान देणे गरजेचे आहे, पण विद्यार्थ्यांसमोर आणखी एक समस्या आहे. जर १४-१५ प्रश्नांना आव्हान द्यावे लागले, तर त्यासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

इतक्या प्रश्नांना चॅलेंज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३,००० रुपये कुठून आणायचे, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आन्सर की मध्ये खरोखरच चुका असतील, तर विद्यार्थ्यांवर प्रत्येक प्रश्नासाठी आर्थिक ताण टाकणे देखील योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Scholarship 2026: परदेशात शिकण्याचे स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या सरकारच्या ‘या’ स्कॉलरशिपला अर्ज करण्याची प्रक्रिया!

इंग्रजी आणि कॉमर्सची पुनर्परीक्षा न घेण्याची मागणी

NTA कार्यालयात पोहोचलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची सर्वात मोठी मागणी हीच होती की, इंग्रजी आणि कॉमर्सची पुनर्परीक्षा घेतली जाऊ नये. विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षा दिली असून ते बऱ्याच काळापासून याची तयारी करत होते, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे त्यांना अतिरिक्त मनस्ताप होईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या इतर परीक्षा आणि स्पर्धा परीक्षाही चालू असतात. अशा वेळी पुनर्प्रक्षेची तारीख इतर परीक्षांच्या तारखांशी टकराव होण्याचा धोकाही कायम आहे.

Web Title: Ugc net exam cancellation protest nta office marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Protest
  • UGC net

संबंधित बातम्या

UGC-NET 2026: युजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर चुका; विद्यार्थ्यांनी शिक्षेची किंमत का मोजावी? ABVP चा प्रश्न!
1

UGC-NET 2026: युजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर चुका; विद्यार्थ्यांनी शिक्षेची किंमत का मोजावी? ABVP चा प्रश्न!

UGC-NET 2026 : चुकीच्या प्रश्नांमुळे UGC-NET चे ३ पेपर झाले रद्द; जाणून घ्या फेरपरीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक!
2

UGC-NET 2026 : चुकीच्या प्रश्नांमुळे UGC-NET चे ३ पेपर झाले रद्द; जाणून घ्या फेरपरीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक!

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
3

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

उमेदवारांची प्रतीक्षा संपली! UGC NET जून २०२६ ची प्रोविजनल आन्सर की जाहीर; तुमचे संभाव्य गुण कसे तपासायचे? जाणून घ्या
4

उमेदवारांची प्रतीक्षा संपली! UGC NET जून २०२६ ची प्रोविजनल आन्सर की जाहीर; तुमचे संभाव्य गुण कसे तपासायचे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.