Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Bank Recruitment 2026: युनियन बँकेत बंपर भरती! ४७ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Union Bank Recruitment 2026 notification: युनियन बँक ऑफ इंडियाने (UBI) ३९५ स्पेशलिस्ट आणि जनरल बँकिंग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 21, 2026 | 03:19 PM
union bank

union bank

Follow Us
Follow Us:

Union Bank Recruitment 2026 notification: बँकिंग क्षेत्रात अधिकारी बनण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नवीन भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने ‘भरती प्रकल्प २०२६-२७’ अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर आणि डोमेन एक्सपर्ट ऑफिसर यांसारख्या विविध एकूण ३९५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ जुलैपासून सुरू झाली असून उमेदवार १० ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती कायमस्वरूपी आधारावर केली जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग बँकेच्या गरजेनुसार देशभरात कुठेही केली जाईल.

कोणत्या पदांसाठी किती जागांवर होणार भरती?

या भरती मोहिमेअंतर्गत मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर स्तरावरील पदे भरली जातील. यामध्ये सर्वात जास्त १६३ पदे मॅनेजरसाठी, १५३ पदे सीनियर मॅनेजरसाठी, ५२ पदे चीफ मॅनेजरसाठी, २० पदे असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी आणि ७ पदे डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा

एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७७ रुपये ठेवण्यात आले आहे, तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना १,१८० रुपये फी द्यावी लागेल. वयोमर्यादा देखील पदानुसार वेगवेगळी निश्चित केली आहे. बहुतांश पदांसाठी किमान वय २२ वर्षे आहे, तर कमाल वय ३० ते ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

APAAR ID प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुलांच्या डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत दिले ‘हे’ निर्देश

निवड प्रक्रिया कशी असेल?

MMGS-II आणि MMGS-III स्तरावरील पदांवर उमेदवारांची निवड आवश्यकतेनुसार ऑनलाईन परीक्षा, त्यानंतर ग्रुप डिस्कशन (गट चर्चा), वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. तर SMGS-IV ते TEGS-VI पर्यंतच्या वरिष्ठ पदांसाठी ग्रुप डिस्कशन, इतर मूल्यमापन आणि मुलाखती आयोजित केल्या जाऊ शकतात.

स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन परीक्षेत प्रामुख्याने संबंधित विषयाचे व्यावसायिक ज्ञान विचारले जाईल, तर जनरल बँकिंग ऑफिसर पदांसाठी रीझनिंग (तर्कशास्त्र), क्वांटिटेटिव्ह अ‍ॅपिट्यूड (अंकगणित), इंग्रजी भाषा आणि प्रोफेशनल नॉलेज या विषयांवर आधारित प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांची नेगेटिव्ह मार्किंग लागू असेल.

वर्षाला मिळणार ४७ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन मिळेल. मॅनेजर स्तरावर सुरुवातीचे वेतन ६४,८२० रुपयांपासून सुरू होईल, तर डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ते १,५६,५०० रुपयांपर्यंत जाईल. बँकेच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या पदांवर अंदाजे वार्षिक सीटीसी सुमारे २१ लाख रुपयांपासून ४७ लाख रुपयांपर्यंत असू शकतो. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, लीव फेअर कन्सेशन आणि इतर भत्त्यांचा लाभही मिळेल.

Government Jobs: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून PO आणि SO च्या पदांमध्ये मोठी वाढ

प्रोबेशन आणि सर्व्हिस बाँड

निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. यासोबतच नियुक्तीनंतर ३ वर्षांचा सर्व्हिस बाँड लागू राहील. जर कोणत्याही उमेदवाराने निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली, तर त्याला पदानुसार ठरवण्यात आलेली बाँडची रक्कम आणि लागू कर भरावे लागतील.

Web Title: Union bank recruitment 2026 specialist officer apply online 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
2

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदात बंपर भरती! २०४९ जागांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
3

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदात बंपर भरती! २०४९ जागांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..
4

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.