Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तपशील!

UPSC CDS 2 Exam Schedule: यूपीएससीने कंबाइंड डिफेंस सर्विसेज (CDS 2) परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेची माहिती सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 12, 2026 | 03:13 PM
cds

cds

Follow Us
Follow Us:

UPSC CDS 2 Exam 2026: युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) ‘कंबाइंड डिफेंस सर्विसेज २ परीक्षा २०२६’ (CDS 2 Exam 2026) ची तारीख आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत सूचनेनुसार, सीडीएस २ परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी घेतली जाईल. ही परीक्षा एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होईल, ज्यामध्ये उमेदवारांची इंग्रजी, जनरल नॉलेज आणि एलिमेंट्री मॅथेमॅटिक्स (प्राथमिक गणित) या विषयांची परीक्षा घेतली जाईल. उमेदवार या परीक्षेची माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.

१३ सप्टेंबर रोजी ३ शिफ्टमध्ये होणार परीक्षा

यूपीएससी सीडीएस २ परीक्षा २०२६ चे पेपर तीन वेगवेगळ्या वेळांमध्ये आयोजित केले जातील. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, इंग्रजीचा पेपर सकाळी ९:०० ते ११:०० वाजेपर्यंत असेल. त्यानंतर जनरल नॉलेजची परीक्षा दुपारी १२:३० ते २:३० वाजेपर्यंत आणि एलिमेंट्री मॅथेमॅटिक्सचा पेपर संध्याकाळी ४:०० ते ६:०० वाजेपर्यंत घेतला जाईल.

सीडीएस २ साठी ४५१ पदे

सीडीएस परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्कर (Army), नौदल (Navy), वायुसेना (Air Force) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये अधिकाऱ्यांच्या पदांवर भरती केली जाते. सीडीएस २ परीक्षा २०२६ साठी विविध अभ्यासक्रमांतर्गत एकूण ४५१ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये इंडियन मिलिट्री अकॅडमी देहरादून, इंडियन नेवल अकॅडमी एझिमाला, एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई यांचा समावेश आहे. यूपीएससीने सीडीएस २ परीक्षेची अधिसूचना २० मे रोजी जारी केली होती, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून ठरवण्यात आली होती.

Government School: एका वर्षात देशात १० हजारांहून अधिक प्राथमिक शाळा घटल्या; लोकसभेत समोर आलेले धक्कादायक आकडे एकदा बघाच…

परीक्षापूर्वी या दिवशी जारी होईल प्रवेशपत्र

सीडीएस २ परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ई-एडमिट कार्ड जारी केले जाईल. परीक्षा तारखेच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवार ते यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतील. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेशपास सोबत एक वैध फोटो ओळखपत्र घेऊन जाणे बंधनकारक असेल.

परीक्षा केंद्रात प्रवेशाबाबतही निर्देश

यूपीएससीच्या निर्देशानुसार प्रत्येक परीक्षा सत्र सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद केले जाईल. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

SBI Clerk recruitment: एसबीआयकडून तब्बल ९,७६६ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या सविस्तर!

ओएमआर शीटसाठी फक्त काळ्या रंगाचा बॉलपेनचा वापर करावा

सीडीएस २ परीक्षेमध्ये उमेदवारांना ओएमआर शीट (OMR Sheet) भरण्यासाठी केवळ काळ्या रंगाच्या बॉलपॉइंट पेनचा वापर करावा लागेल. पेन्सिल किंवा इंक पेन वापरण्याची परवानगी असणार नाही. उमेदवारांना ओएमआर शीटवर रोल नंबर आणि टेस्ट बुकलेट सिरिज कोड यांसारखी माहिती भरताना विशेष काळजी घ्यावी लागेल. यामध्ये काही चूक झाल्यास किंवा माहिती सुटल्यास उत्तरपत्रिका रद्द केली जाऊ शकते. तसेच सीडीएस २ परीक्षेच्या वस्तुनिष्ठ (Objective Type) प्रश्नांमध्ये चुकीचे उत्तर दिल्यास निगेटिव्ह मार्किंगचा (Negative Marking) नियम लागू राहील. उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे देताना या गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Upsc cds 2 exam 2026 schedule news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Exam
  • UPSC

संबंधित बातम्या

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
1

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
2

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
3

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.