Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LBSNAA Training Rules: यूपीएससी पास झालात; ट्रेनिंगदरम्यानच्या ‘या’ कडक नियमांमुळे जाऊ शकते नोकरी!

LBSNAA Training Rules 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे ही केवळ सुरुवात आहे. मसुरीच्या 'लबासना' अकादमीत प्रशिक्षण घेताना आयएएस अधिकारी कोणत्या विषयांत नापास होतात आणि तिथले शिस्तीचे कडक नियम काय आहेत? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 11, 2026 | 04:56 PM
lbasna

lbasna

Follow Us
Follow Us:

LBSNAA Training Rules 2026: दरवर्षी लाखो तरुण रात्रंदिवस अभ्यास करून यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करतात. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर जेव्हा ते अव्वल रँक मिळवून आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) म्हणून निवडले जातात, तेव्हा त्यांची मेहनत यशस्वी झाल्यासारखी वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की, देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणारे हे ‘सुपर माइंड्स’ देखील मसुरी येथील ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA – लबासना) मध्ये जाऊन नापास होऊ शकतात? हे ऐकायला जरी धक्कादायक वाटत असले, तरी अकादमीचे नियम आणि रेकॉर्ड काहीसे असेच सांगतात.

‘लबासना’ अकादमीच्या अंतर्गत मूल्यमापन नियमांनुसार, दरवर्षी अनेक आयएएस प्रोबेशनर्स (ट्रेनी ऑफिसर्स) असे असतात जे लबासनाच्या परीक्षांमध्ये एक किंवा अधिक विषयांत नापास होतात. खरं तर, केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा पास होणे ही तर या मोठ्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची खरी प्रशासकीय कसोटी आणि कठीण परीक्षा तर मसुरीच्या दऱ्याखोऱ्यांत म्हणजेच आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये पाऊल ठेवल्यानंतर सुरू होते.

अधिकारी ‘लबासना’ अकादमीमध्ये कोणत्या विषयांत नापास होतात?

लबासनामधील २ वर्षांचे प्रशिक्षण हा कोणताही साधा ओरिएंटेशन प्रोग्राम नाही. येथे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कायदा, भारतीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक प्रशासन, संविधा आणि व्यवस्थापन यांसारखे जड आणि महत्त्वाचे विषय शिकवले जातात. या सर्व विषयांच्या रीतसर लेखी परीक्षा घेतल्या जातात आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५०% गुण मिळवणे अनिवार्य असते. अनेकदा कामाचा प्रचंड ताण किंवा अभ्यासक्रमाची कठीण पातळीमुळे देशातील टॉपर्स देखील पहिल्याच प्रयत्नात हे पेपर्स क्लिअर करू शकत नाहीत.

World Population Day 2026: वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कायदे नव्हे, तर ‘हे’ मानवी शस्त्र ठरणार सर्वात प्रभावी!

या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरते ते म्हणजे त्यांना मिळालेल्या राज्याची (कॅडर) प्रादेशिक भाषा शिकणे. जेव्हा बिहारचा एखादा हिंदी भाषिक अधिकारी तेलंगणा कॅडरसाठी निवडला जातो, तेव्हा त्याला अनिवार्यपणे तेलुगू भाषा शिकावी लागते आणि त्याची परीक्षा पास करावी लागते. जे अधिकारी स्थानिक भाषेवर पकड मिळवू शकत नाहीत, त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करताना अडचणी येतात. बरेच अधिकारी सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये हा लँग्वेज टेस्ट पास करण्यात अपयशी ठरतात, कारण काही महिन्यांतच पूर्णपणे नवीन भाषा लिहिणे, वाचणे आणि बोलणे शिकणे सोपे नसते.

नापास झाल्यावर नोकरी जाते का?

लबासनाच्या नियमांनुसार, ही परीक्षा पास करण्यासाठी प्रयत्नांची (Attempts) कोणतीही निश्चित मर्यादा नाही. अधिकाऱ्यांना काही दिवसांतच पुन्हा परीक्षा (Re-exam) देण्याची संधी मिळते आणि ते आपला अनुशेष (Backlog) क्लिअर करतात. गेल्या अनेक वर्षांत लबासनाचा एकूण पासिंग रेकॉर्ड १००% राहिला आहे आणि या कारणास्तव कोणालाही नोकरीवरून काढण्यात आलेले नाही. मात्र, या परीक्षांचे गुण अत्यंत महत्त्वाचे असतात. लबासनामध्ये मिळणारे गुणच ठरवतात की बॅचमध्ये कोण सिनिअर राहील आणि कोणाचे प्रमोशन आधी होईल.

Re NEET UG 2026 Cutoff: सरकारी कॉलेजमध्ये MBBS सीटसाठी किती मार्क्स हवेत? पाहा प्रवर्गनिहाय संभाव्य ‘सेफ स्कोर’

शिस्तीचे कडक नियम

लबासनामध्ये केवळ अभ्यासालाच नव्हे, तर शिस्तीलाही खूप महत्त्व आहे. गेल्या काही काळात अनेक आयएएस प्रोबेशनर्सवर शिस्तभंगाची कारवाई  करण्यात आली आहे. अकादमीमध्ये सकाळी होणाऱ्या शारीरिक प्रशिक्षणाला (PT) उशिरा पोहोचणे, क्लासमध्ये मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे किंवा कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहणे, अशा गोष्टींवर सक्त ताकीद दिले जाते. जर एखादा प्रशिक्षणार्थी अधिकारी जाणूनबुजून अभ्यासात निष्काळजीपणा करत असेल किंवा त्याच्यात लोकसेवकाचे गुण दिसत नसतील, तर केंद्र सरकारकडे त्याचा प्रोबेशन कालावधी वाढवण्याचा किंवा त्याला सेवेतून काढून टाकण्याचा अधिकार देखील सुरक्षित आहे.

Web Title: Upsc lbsnaa training rules mussoorie ias probationers failed cadre language test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Rule
  • Training Program
  • UPSC

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी
2

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.