फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
‘री-नीट यूजी २०२६’ (Re NEET UG 2026) परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता लाखो उमेदवार निकाल आणि कटऑफची प्रतीक्षा करत आहेत. अशा परिस्थितीत, ‘सरकारी एमबीबीएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किती गुण सुरक्षित मानले जातील?’ हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील वर्षांचे ट्रेंड्स आणि कौन्सिलिंगच्या आधारे संभाव्य सेफ स्कोरचा अंदाज काय असू शकतो. चला तर मग जाणून घेऊया
Re NEET UG 2026 नंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची स्पर्धा नेहमीप्रमाणेच चुरशीची राहण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६१० किंवा त्याहून अधिक गुण सुरक्षित मानले जाऊ शकतात. तर ईडब्ल्यूएस (EWS) साठी ६००+, ओबीसीसाठी ५९०+, एससीसाठी ५२०+ आणि एसटीसाठी ४९०+ गुण चांगले मानले जात आहेत. अर्थात, अंतिम कटऑफ हा निकाल आणि कौन्सिलिंगनंतरच निश्चित होईल.
जर एखाद्या उमेदवाराला ६८० किंवा त्याहून अधिक गुण मिळाले, तर त्याला एम्स (AIIMS) आणि देशातील मोठ्या सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळण्याची दाट शक्यता असेल. ६५० ते ६७९ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या उत्तम संधी मिळतील. ६२० ते ६४९ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांकडे ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा (State Quota) दोन्हीमध्ये चांगली संधी असू शकते. ६०० ते ६१९ गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये जागा मिळण्याची आशा असेल, तर ५५० ते ५९९ गुण मिळवणाऱ्यांचे ॲडमिशन हे त्यांचे राज्य, प्रवर्ग आणि कौन्सिलिंगवर अवलंबून असेल.
१५ टक्के ऑल इंडिया कोट्यांतर्गत (AIQ) दरवर्षी देशभरातील विद्यार्थी एकमेकांशी स्पर्धा करतात, त्यामुळे येथील कटऑफ सहसा जास्त राहतो. यंदा सामान्य प्रवर्गासाठी ६१५ ते ६३०+, ईडब्ल्यूएससाठी ६१० ते ६२५+, ओबीसीसाठी ५९० ते ६१०+, एससीसाठी ५२० ते ५५०+ आणि एसटी प्रवर्गासाठी ५०० ते ५४०+ गुणांपर्यंत कटऑफ जाण्याचा अंदाज आहे.
या वर्षीचा कटऑफ अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. जर परीक्षा सोपी आली असेल आणि जास्त विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले असतील, तर कटऑफ वाढू शकतो. याउलट, पेपर कठीण असल्यास कट ऑफमध्ये थोडी घट होऊ शकते. याशिवाय, परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची संख्या, उपलब्ध एमबीबीएस जागा, आरक्षण धोरण आणि कौन्सिलिंगचा ट्रेंड हे देखील अंतिम कटऑफ ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी आपल्या स्कोर आणि रँकनुसार ‘AIQ’ आणि ‘स्टेट कोटा’ कौन्सिलिंगची तयारी सुरू करावी. आपल्या पसंतीच्या मेडिकल कॉलेजेसची यादी आधीच तयार ठेवावी आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत व्यवस्थित करून घ्यावेत, जेणेकरून कौन्सिलिंग दरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.






