Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसईतील उत्कर्ष विद्यालयाने मारली बाजी! ‘या’ तालुकास्तरीय उपक्रमात प्रथम क्रमांकाने सन्मानित

"मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसई तालुक्यातील बहुतेक शाळांनी यात सहभाग घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे उत्कर्ष विद्यालयाने या उपक्रमात द्वितीय स्थान मिळवले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2025 | 04:22 PM
वसईतील उत्कर्ष विद्यालयाने मारली बाजी! ‘या’ तालुकास्तरीय उपक्रमात प्रथम क्रमांकाने सन्मानित
Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा १ (२०२४-२५) या अभियानांतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या उपक्रमामध्ये विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग (मराठी माध्यम) या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत वसई तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. शालेय गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शासनाने दिलेल्या विविध निकषांवर शाळेने उच्च स्थान प्राप्त केले आहे. शाळेच्या उत्तम कामिगिरीमुळे शाळेची सर्वत्र चर्चा होत आहे. एकदंरीत, वसईत या चर्चेला उधाण आले आहे.

इंजिनिअरिंग मध्ये नापास झालात? टेन्शन नॉट! मिळवणार पुढच्या वर्गात प्रवेश

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कामगिरीबद्दल तीन लाख रुपयांचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक तसेच त्यांच्या सहकारी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सेंट अँथनी हायस्कूल, मालोंडे, वसई (पश्चिम) येथे पार पडला. वसई तालुक्यात प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या शाळांचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. अशोक पाटील (सभापती, पंचायत समिती, वसई), गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी तसेच वसई पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उत्कर्ष विद्यालयाने तालुकास्तरीय स्तरावर आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. याबद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर यांनी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले. तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये आणि विद्यालय समन्वयक नारायण कुट्टी यांनीही शिक्षक वृंदाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

B.Ed तसेच M.Ed अभ्यासक्रमाची कालावधी आली घटवण्यात; एका वर्षासाठी असणार कोर्स, ‘या’ उमेदवारांना करता येणार अर्ज

ही कामगिरी उत्कर्ष विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे प्रतीक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण आणि सुविधा मिळण्यास मदत होईल. या यशानंतर उत्कर्ष विद्यालय भविष्यात आणखी उच्च लक्ष्य गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. वसईच्या उत्कर्ष विद्यालयाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे ही शाळा स्थानिक क्षेत्रातील एक दर्जेदार शाळा म्हणून नावारूपास येत आहे.

Web Title: Utkarsh vidyalaya secured second position in the taluka level initiative mukhyamantri mazi shala sundar shala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • #VasaiNews
  • education news

संबंधित बातम्या

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती
1

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती

2026 मध्ये बदलणार गणिताचा अभ्यास, NCERT ने काढले नवे पुस्तक; आता विद्यार्थ्यांना आकडेरूपी राक्षसाची भीती नाही वाटणार!
2

2026 मध्ये बदलणार गणिताचा अभ्यास, NCERT ने काढले नवे पुस्तक; आता विद्यार्थ्यांना आकडेरूपी राक्षसाची भीती नाही वाटणार!

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती
3

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती

NEET and JEE Entrance Exams: नीट व जेईई प्रवेश परीक्षांत ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञान बंधनकारक
4

NEET and JEE Entrance Exams: नीट व जेईई प्रवेश परीक्षांत ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञान बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.