फोटो सौजन्य - Social Media
एका दशकाच्या संपूर्ण कालावधीनंतर शिक्षण खात्याच्या या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. एकंदरीत, B.Ed तसेच M.Ed या अभ्यासक्रमाची कालावधी घटवण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून हे बदल करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती नॅशनल काउंसिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE)चे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी दिली आहे. मुळात, B.Ed तसेच M.Ed या अभ्यासक्रमाची कालावधी आता एका वर्षांची असणार आहे. विशेष बाब अशी आहे कि या अभ्यासक्रमाची कालावधी प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे.
परंतु, एका वर्षाच्या B.Ed तसेच M.Ed प्रोग्रॅममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांना काही निकष पात्र असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रात चार वर्षांची पदवी कार्यक्रम किंवा पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला आहे. त्यांनाच या एक वर्षीय B.Ed तसेच M.Ed अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार आहे. तीन वर्षीय पदवी कार्यक्रम किंवा पदव्युत्तर कार्यक्रम उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना यामध्ये प्रवेश मिळवता येणार नाही. त्यांच्यासाठी B.Ed तसेच M.Ed प्रोग्राम दोन वर्षीय असणार आहे. तसेच शिक्षक बानू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी Integrated Teacher Education Programme (ITEP) हा पर्याय उपल्बध आहे. उमेदवारांना NCTE च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या प्रोग्रॅमसाठी अर्ज करता येते. हा प्रोग्रॅममध्ये उमेदवारांना चार वर्षांसाठी शिक्षण घेता येते.
एकंदरीत, जर तुम्ही बारावी उत्तीर्ण आहात आणि शिक्षक बनण्याची इच्छा आहे, तर तुम्ही ITEP हा पर्याय निवडू शकता. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून ITEP शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण या विशेष कार्यक्रमांची सुरुवात केली जाणार असल्याचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले. तसेच यामध्ये योगसाधनेलाही प्राथमिकता देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जर कुणी तीन वर्षांच्या कोर्सनंतर शिक्षक बनण्याचा निश्चय केला आहे तर नक्कीच उमेदवारांना पुढील दोन वर्षांसाठी बी.एड करता येणार आहे.
तर चार वर्षांचा कार्यकाळ असणाऱ्या पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण केलेल्या उमेदवारांना केवळ एका वर्षासाठी B.Ed तसेच M.Ed प्रोग्रॅममध्ये अभ्यास करता येणार आहे आणि डिग्री मिळवता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी जाहीर करण्यात आलेले हे निर्णय वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगेवगेळे असल्याचे नॅशनल काउंसिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE)चे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले आहे.