Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही

व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद झाल्यामुळे 100 हून अधिक बारावी विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकत नसल्याने त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 14, 2025 | 06:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • कॉलेज बंद, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला बसता न आल्याने चिंता वाढली
  • मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघाची शिक्षण विभागाकडे मागणी
  • ‘नियमित विद्यार्थी’ मानले जात असल्याने फॉर्म भरता येत नाही.

मुंबईतील करी रोड येथील व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज कायमस्वरूपी बंद झाल्याने या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या बारावीच्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ते फॉर्म भरू शकत नसल्याने त्यांना परीक्षेलाच बसता येणार की नाही, याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका

या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघाने विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी मागील 2–3 वर्षांत एका-दोन विषयांत नापास झाल्यामुळे पुन्हा बारावीची परीक्षा देत आहेत. परंतु असे विद्यार्थी ‘नियमित विद्यार्थी’ मानले जात असल्याने त्यांना खाजगीरित्या फॉर्म भरता येत नाही. नियमांनुसार त्यांचे परीक्षा फॉर्म त्याच कॉलेजमार्फत भरले जाणे आवश्यक आहे.

पण कॉलेजच बंद झाल्याने फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. विद्यार्थी आणि पालक कॉलेजच्या दाराशी वारंवार धाव घेत असूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जाते. सध्या बारावी परीक्षेच्या फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू आहे. मात्र व्ही. व्ही. के. शर्मा कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थी विविध कार्यालयांची पळापळ करत आहेत. तरीही त्यांना अद्याप यश आलेले नाही.

थोटलूर डेविड भीमप्पा या विद्यार्थ्याने तर शिक्षण निरीक्षकांना पत्र लिहून, “मला बारावीच्या परीक्षेत बसू द्या,” अशी विनंती केली आहे. तो 2023 मध्ये परीक्षेस बसला होता, परंतु फक्त ‘बुक-कीपिंग’ या एका विषयात नापास झाल्यामुळे त्याचे पुढील शिक्षण थांबले आहे. मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एस. एल. दीक्षित यांनी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांना पत्र लिहून, या 100 हून अधिक विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून बारावीच्या परीक्षेस बसण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

हिंदी विद्यापीठाचे 10 विद्यार्थी निलंबित! महापुरुषांचा अवमान प्रकरणावरून कारवाई; विद्यापीठात तणाव 

दीक्षित यांनी सांगितले की, “हे विद्यार्थी नियमित असल्याने त्यांचे फॉर्म कॉलेजकडूनच भरावे लागतात. कॉलेज बंद झाल्यामुळे ते पूर्णपणे अडचणीत आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचवावे.

Web Title: V v k sharma junior college closed students will not be able to fill the 12th form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 06:36 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका
1

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका

ICSE, ISC Date Sheet 2026 OUT: विद्यार्थ्यांनो! लागा तयारीला, फेब्रुवारीत होणार परीक्षा
2

ICSE, ISC Date Sheet 2026 OUT: विद्यार्थ्यांनो! लागा तयारीला, फेब्रुवारीत होणार परीक्षा

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?
3

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

परीक्षा द्यायची गरज नाही! २.८ लाख मिळवण्यासाठी करा पटपट अर्ज, दिल्ली मेट्रो…
4

परीक्षा द्यायची गरज नाही! २.८ लाख मिळवण्यासाठी करा पटपट अर्ज, दिल्ली मेट्रो…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.