फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय विद्यालय (KVS) आणि नवोदय विद्यालय (NVS) मध्ये सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी यंदा मोठी संधी आली आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या ताज्या नोटिफिकेशननुसार दोन्ही संस्थांमध्ये मिळून तब्बल 14,967 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शॉर्ट नोटिफिकेशननंतर आता डिटेल नोटिफिकेशन देखील जाहीर करण्यात आले असून 14 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. उमेदवार सीबीएसईच्या www.cbse.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये टीचिंग आणि नॉन-टीचिंग अशा दोन्ही विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (KVS NVS Recruitment)
टीजीटी, पीजीटी, पीआरटी, प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल अशा महत्त्वाच्या पदांपासून ते KVS आणि NVS मधील विविध नॉन-टीचिंग पदांपर्यंत अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. KVS मध्ये PGT चे 1465, TGT चे 2794, PRT चे 3365 तर NVS मध्ये PGT चे 1513, TGT चे 2978 आणि तिसऱ्या भाषेतील TGT चे 443 पदे उपलब्ध आहेत. दोन्ही शाळांमध्ये प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल, असिस्टंट कमिश्नर यांसाठीही बंपर पदे जाहीर करण्यात आली आहेत. नॉन-टीचिंगमध्ये KVS मध्ये 1155 आणि NVS मध्ये 787 पदांवर भरती होणार आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. असिस्टंट कमिश्नरसाठी मास्टर्स व बीएडची पदवी तसेच किमान 50 टक्के गुण अपेक्षित आहेत. प्रिंसिपल आणि वाइस प्रिंसिपलसाठी मास्टर्स, बीएडसोबत 9 ते 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
TGT पदांसाठी संबंधित विषयात पदवी, बीएड आणि CTET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. नॉन-टीचिंग पदांसाठी 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा पदवी या पात्रता लागू आहेत. उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी डिटेल नोटिफिकेशन पाहणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी सीबीएसईच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करावे, वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरावे, आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करावेत आणि निर्धारित शुल्क भरून अर्ज सबमिट करावा. प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल आणि असिस्टंट कमिश्नर पदांसाठी सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांना ₹2800 शुल्क लागेल, तर SC/ST/PwD/ESM उमेदवारांना ₹500 शुल्क ठेवण्यात आले आहे.
PGT, TGT, PRT आणि इतर अधिकारी पदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गाला ₹2000 आणि राखीव प्रवर्गाला ₹500 शुल्क लागणार आहे. JSA, स्टेनो, SSA, लॅब अटेंडंट आणि MTS पदांसाठी सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गाचे शुल्क ₹1700 तर SC/ST/PwD/ESM प्रवर्गाचे शुल्क ₹500 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2025 असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.






