Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Preparation: विकास दिव्यकीर्ती सरांच्या मते IAS होण्यासाठी ‘या’ ३ सवयी आहेत सर्वात महत्त्वाच्या; तुम्ही त्या फॉलो करता का?

UPSC Preparation Tips: यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनण्यासाठी विकास दिव्यकीर्ती सरांनी ३ सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 09:58 AM
upsc

upsc

Follow Us
Follow Us:

यूपीएसी (UPSC) परीक्षा आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, परंतु यश काही मोजक्याच लोकांना मिळते. देशातील अनेक शिक्षक यूपीएसीसी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ‘दृष्टी आयएएस’चे (Drishti IAS) संस्थापक आणि प्रसिद्ध शिक्षक विकास दिव्यकीर्ती यांचेही असेच मानणे आहे की, आयएएस होण्यासाठी कोणत्याही जादूची नव्हे तर तीन मूलभूत सवयींची आवश्यकता आहे, चला तर मग जाणून घेऊया या तीन सवयींबद्दल..

१. पहिली सवय: विषयाचे सखोल आकलन (Deep Understanding)

विकास दिव्यकीर्ती सरांच्या मते, यूपीएससीच्या तयारीची सुरुवात चांगल्या अभ्यासाने होते. त्यांचे म्हणणे आहे की, फक्त पुस्तके संपवण्यावर लक्ष केंद्रीत करू नका तर प्रत्येक विषय खोलवर समजून घ्या. तुम्ही जे काही वाचाल ते बारकाईने वाचा. त्यामागील संकल्पना  पूर्णपणे समजून घ्या, असा सल्ला ते देतात. एखाद्या मित्रांशी त्या घटकावर चर्चा करा आणि जोपर्यत तो विषय पूर्णपणे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याचा अभ्यास करा. तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एनसीईआरटीची (NCERT) पुस्तके हा सर्वात उत्तम सुरुवातीचा पाया मानला जातो.

Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

२. दुसरी सवय: प्रभावी उत्तर लेखन कौशल्य (Answer Writing Skill)

विकास दिव्यकीर्ती सरांचा दुसरा सल्ला असा आहे की, यूपीएसी मुख्य परीक्षेत फक्त माहिती असणे पुरेसे नसते. तर ती माहिती मर्यादित शब्दांत आणि प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. मुख्य परीक्षेतील सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे उत्तर लेखन होय. दिव्यकीर्ती सरांच्या मते, उमेदवरांना रोज लिहण्याची सवय लावली पाहिजे. हजार शब्दांची माहिती २०० ते २५० शब्दात संकलित करण्याचा सराव केला पाहिजे, यामुळे विचार करण्याची आणि लिहण्याची क्षमता विकसित होते. उत्तरांमध्ये जास्तीत जास्त तथ्ये, आकडेवारी आणि अधिकृत माहितीचा समावेश करावा कारण यूपीएससीमध्ये तथ्यांवर आधारित उत्तरे जास्त प्रभावी मानली जातात.

३. तिसरी सवय: संभाषण कला आणि व्यक्तिमत्त्व विकास (Communication Skills)

दिव्यकीर्ती सरांची तिसरा सल्ला असा आहे की, अनेक उमेदवार अभ्यासावर आणि लिहिण्याकडे लक्ष देतात. पण बोलण्याची कलेकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात संवादाची सवय विकसित केली, तर मुलाखतीची वेगळी तयारी करण्याची गरज पडत नाही. मित्रांसोबत चर्चा करा , ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्या आणि आपले मत उघडपणे मांडा्यला शिका. कॉलेजमधील वादविवाद स्पर्धा, ड्रामा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेतल्याने व्यक्तिमत्त्व विकासात मदत होते. यामुळे आत्मविश्वास वाढून इंटरव्यू बोर्डासमोर आपली बाजू मांडण्यास मदत होते.

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?

अभ्यासासाठी किती वेळ देणे आवश्यक आहे?

महत्त्वाचा सल्ला: दिव्यकीर्ती सरांंच्या मते, सुरुवातीच्या उमेदवारांसाठी दररोज ६ ते ७ तासांचा अभ्यास पुरेसा असतो. मात्र, जसजशी तयारी गंभीर टप्प्यावर पोहचते, तसतसा वेळ हळूहळू ८ ते १० तास केला पाहिजे. जेव्हा एखादा उमेदवार आपल्या ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित होतो,तेव्हा त्याला कोणत्याही प्रेरणेची गरज भासत नाही.

Web Title: Vikas divyakirti upsc preparation tips three habits to become ias marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • IAS exam
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Prelims Result 2026: यूपीएससी प्रीलिम्स निकालाची तारीख ठरली? असा तपासा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी..
1

UPSC Prelims Result 2026: यूपीएससी प्रीलिम्स निकालाची तारीख ठरली? असा तपासा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी..

Inspiring Story: दीड वर्षाच्या मुलीला सोडून मसुरीत कडक प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या क्लास वन ऑफिसर..
2

Inspiring Story: दीड वर्षाच्या मुलीला सोडून मसुरीत कडक प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या क्लास वन ऑफिसर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.