फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Government Job Backup Plan: सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक लोकांचे स्पप्न असते.दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC), कर्मचारी निवड आयोग(SSC), बँकिंग, रेल्वे आणि इतर राज्यस्तरीय परीक्षांच्या तयारीसाठी अनेक वर्ष घालवतात. परंतु, सध्याच्या स्पर्धेमुळे कोणालाही यशाची हमी देता येत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे एक मजबूत ‘बॅकअप प्लान’ (पर्यायी योजना) असणे आवश्यक आहे. यामुळे भविष्य सुरक्षित राहण्याबरोबर कमाईचे नवे स्त्रोत खुले होतात.
आजच्या काळात डिजिटल स्किल्स ही सर्वात वेगाने वाढणारी आणि मागणी असणारी कौशल्ये आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी डिजिटल मार्केटिंग, डेटा ॲनालिटिक्स, ग्राफिक डिझायनिंग, कंटेट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा वेब डेव्हलपमेंट सारखी कौशल्ये आत्मसात करू शकतात. या क्षेत्रामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही संधी उपलब्ध आहेत.
जर एखादा उमेदवार बऱ्याच काळापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्यांनी अकाउंटिंग, फायनान्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सायबर सिक्युरिटी, हाॅस्पिटॅलिटी, मॅनेजमेंट किंवा इतर नोकरीभिमुख (Job-Oriented) कोर्सेसचे शिक्षण घ्यावे. या कोर्सेसमुळे करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतात.
आजच्या तरुणांसाठी फ्रीलांसिंग हे कमाई आणि अनुभव या दोन्ही गोष्टी मिळवण्याचे एक उत्तम माध्यम बनले आहे. कंटेट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, व्हिडिओ एडिटिंग आणि प्रोग्रामिंग यांसारख्या सेवांची मागणी बाजारात वाढत आहे. विद्यार्थ्यांनी हे कोर्सेस शिकल्यावर त्यांना अभ्यासाचे आणि परीक्षेच्या तयारीचे वेळापत्रक संभाळून घरबसल्या प्रोजेक्टवर काम करू शकतात. त्यामुळे हा त्यांच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत होऊ शकतो.
तज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फ्रिलांसिंग, डिजिटल स्किल्स यांसारख्या पर्यायाचा अवलंब केल्यास ते पूर्णपणे बेरोजगार राहणार नाहीत आणि त्यांचे करिअर ही सुरक्षित राहील.






