फोटो सौजन्य - Social Media
हिप-हॉप ही एक सशक्त आणि जलद गतीने वाढणारी कला आहे. रॅपिंग, बीटबॉक्सिंग, डान्सिंग (ब्रेकडान्सिंग, क्रंपिंग, लॉकिंग-पॉपिंग), ग्रॅफिटी आणि डीजेईंग हे तिचे प्रमुख घटक आहेत. भारतातही हिप-हॉप आता केवळ स्ट्रीट कल्चरपुरता मर्यादित न राहता करिअरचा एक पर्याय बनतो आहे. जर तुम्हाला रॅपर किंवा डान्सर म्हणून हिप-हॉपमध्ये करिअर करायचं असेल, तर खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
सर्वप्रथम, तुमचा फोकस ठरवा. तुम्ही रॅपिंगमध्ये करिअर करू इच्छिता की हिप-हॉप डान्समध्ये? की दोन्ही? यानुसार तुमचा सराव आणि अभ्यास ठरतो. रॅपर होण्यासाठी लिरिक्स लिहिणे, फ्लो डेव्हलप करणे, आणि तुमचा स्वतःचा आवाज तयार करणे आवश्यक असते. तर डान्सरसाठी बॉडी कंट्रोल, पॉवर मूव्ह्स आणि रिदमवर तंत्र येणं महत्त्वाचं आहे.
दररोज प्रॅक्टिस करणे हा यशाचा मूलमंत्र आहे. हिप-हॉपमध्ये सातत्य हेच सर्वकाही आहे. दररोज लिरिक्स लिहा, फ्रीस्टाईल करा, किंवा डान्सचे मूव्ह्स सरावात आणा. हळूहळू तुमचं आत्मविश्वास आणि कला दोन्ही वाढतील. तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी आजच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे. इंस्टाग्राम, युट्यूब, Moj किंवा Josh सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचे रॅप्स, डान्स व्हिडिओ, कव्हर क्लिप्स पोस्ट करा. हॅशटॅग वापरून योग्य ऑडियन्सपर्यंत पोहचा.
तुमच्या परिसरात किंवा शहरात होणाऱ्या इव्हेंट्समध्ये भाग घ्या. कॉलेज फेस्ट्स, रॅप बॅटल्स, डान्स स्पर्धा, ओपन माईकस या तुम्हाला लोकांसमोर सादर होण्याची संधी देतात. नेटवर्किंग करा. इतर रॅपर्स, बीटमेकर, डान्स क्रूज, डीजे यांच्याशी संपर्कात रहा. कोलॅबोरेशनमधून तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील आणि exposure मिळेल. शक्य असल्यास प्रोफेशनल ट्रेनिंग घ्या. रॅप राईटिंग, म्युझिक प्रोडक्शन किंवा स्ट्रीट डान्सचे क्लासेस तुमचं कौशल्य अधिक गडद करतील.
सर्वात महत्त्वाचं धीर आणि चिकाटी ठेवा. सुरुवातीला struggle होईल, views कमी मिळतील, पण कंटाळू नका. हिप-हॉपमध्ये स्वतःचं युनिक स्टाइल तयार करणं हेच खरी ओळख बनते. हिप-हॉप हे केवळ नाच किंवा गाणं नसून स्वतःला व्यक्त करण्याचा सशक्त माध्यम आहे. तुमच्या आवाजावर विश्वास ठेवा!