Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंदिर व्यवस्थापनातील नवी पिढी तयार करण्यासाठी वीस्कूल सज्ज! दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश जाहीर

वीस्कूलतर्फे भारतातील पहिल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन टेंपल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. हा उपक्रम मंदिर व्यवस्थापनाला व्यावसायिक व आधुनिक दृष्टीकोन देणारा पायोनियर ठरत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 12, 2025 | 03:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (वीस्कूल), मुंबई यांनी भारतातील पहिल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन टेंपल मॅनेजमेंट (PGPTM) च्या दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली आहे. पहिल्या बॅचच्या यशानंतर हा कार्यक्रम आता अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात असून सप्टेंबर 2025 पासून नवीन बॅच सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम टेम्पल कनेक्ट या संस्थेच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून, मंदिर व धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाला व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून बळकटी देणे हा त्यामागचा उद्देश आहे.

पठ्ठ्या झालेला दहावी नापास! आता आहे IPS… कमी गुणांमुळे हताश होण्याऐवजी ‘हे’ वाचा

आज मंदिर केवळ उपासनेसाठीची जागा न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाची व्यावसायिक गरज अधोरेखित होत असून वीस्कूलचा हा उपक्रम त्या दिशेने एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. या अभ्यासक्रमात समुदाय व्यवस्थापन, आध्यात्मिक अर्थव्यवस्था, वारसा संवर्धन, धार्मिक संस्थांमधील नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी मंदिर भेटी, तज्ज्ञांशी संवाद, विविध व्यवस्थापन पद्धतींचे निरीक्षण अशा प्रॅक्टिकल उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या बॅचमध्ये ISKCON चौपाटी, ऋषिकेश, जीवदानी देवी मंदिर यांसारख्या संस्थांबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांनीही सहभाग नोंदवला होता. यंदा प्रवेशसंख्या तीनपट वाढून 60 पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाच्या महत्त्वावर बोलताना वीस्कूलचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी सांगितले की, “PGPTM च्या पहिल्या बॅचचे यश हे आमच्या सामाजिक जबाबदारीशी निगडीत शैक्षणिक दृष्टीकोनाचे उदाहरण आहे. आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि भारताचा आध्यात्मिक वारसा यांचा संगम साधून आम्ही अशी व्यावसायिकांची नवी पिढी तयार करू इच्छितो जी समाजाच्या विविध क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवेल.”

गावाकडच्या तरुणाची कमाल! 500 नकारांनंतर मिळवली ओपनएआयच्या प्रोजेक्टमध्ये महिन्याला 20 लाखांची संधी

मंदिर व्यवस्थापनात शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्यांना एकत्र आणणारा हा देशातील पहिला उपक्रम असल्यामुळे याला विद्यार्थ्यांकडून आणि धार्मिक संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आधुनिक काळात धार्मिक संस्था आणि मंदिरे समाजजीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने या उपक्रमातून प्रशिक्षित व्यवस्थापकांची नवी पिढी तयार होणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञ मानतात.

Web Title: Weschool is ready to create a new generation in temple management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

Pune News: “… हे  केवळ भ्रष्टाचाराला आमंत्रण”; विद्यार्थी संघर्ष कृती समिती केली ‘ही’ मोठी मागणी
1

Pune News: “… हे  केवळ भ्रष्टाचाराला आमंत्रण”; विद्यार्थी संघर्ष कृती समिती केली ‘ही’ मोठी मागणी

Shefali Verma: 10 वी नापास, 12 वी 80%; तुफान फलंदाजी आणि अतूट जिद्दीने शेफाली वर्माने रचला इतिहास
2

Shefali Verma: 10 वी नापास, 12 वी 80%; तुफान फलंदाजी आणि अतूट जिद्दीने शेफाली वर्माने रचला इतिहास

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 : दहावी – बारावीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा
3

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 : दहावी – बारावीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

‘क्लायमेट वर्कफोर्स समिट’द्वारे भारताच्या हरित परिवर्तनाला गती; अशोका विद्यापीठ आणि ईडीएफची संयुक्त पुढाकार
4

‘क्लायमेट वर्कफोर्स समिट’द्वारे भारताच्या हरित परिवर्तनाला गती; अशोका विद्यापीठ आणि ईडीएफची संयुक्त पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.