Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

DIKSHA Portal: दीक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मची संपूर्ण माहिती, QR कोड असलेली पुस्तके, कोर्सेस आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 08, 2026 | 05:07 PM
diksha

diksha

Follow Us
Follow Us:

DIKSHA Portal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या समारंभात बोलताना सांगितले की, मोबाईल आणि इंटरनेटमुळे देशातील दूरदूरच्या भागांत राहणाऱ्या मुलांसाठी आणि गरीब कुटुंबांसाठी शिक्षणाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. कोविडच्या काळातही ऑनलाइन शिक्षणाद्वारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले आणि २०२२ पर्यंत दीक्षा प्लॅटफॉर्मवर ५०० कोटींहून अधिक लर्निंग सेशन्स नोंदवले गेले. शिक्षणाची सर्वात जास्त गरज असलेल्या समाजातील घटकांपर्यंत ऑनलाइन शिक्षणाचे सर्व माध्यम उपलब्ध करून देणे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळेच्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोड ऑनलाइन कोड, ऑनलाइन अभ्यास किंवा शिक्षक प्रशिक्षण यासंदर्भात दिक्षा हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये पाठ्यपुस्तकांतून ते व्हिडिओ परस्परसंवादी सामग्री कोर्सेस आणि इतर डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध असते. हे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एनसीईआरटीच्या (NCERT) पुढाकाराने सीआयईटीच्या (CIET) सहकार्याने विकसित करण्यात आले असून याची सुरुवात २०१७ मध्ये झाली होती.

DIKSHA म्हणजे नेमके काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, DIKSHA हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित इतर लोक शिक्षणाशी संबंधित डिजिटल साहित्य मिळवू शकतात. हा ‘पीएम ई-विद्या’ (PM e-VIDYA) चा एक प्रमुख भाग आहे आणि शालेय शिक्षणासाठी ‘वन नेशन, वन डिजिटल प्लॅटफॉर्म’ म्हणून याचा वापर केला जातो. याचा विस्तार केवळ एका इयत्तेपुरता किंवा बोर्डापुरता मर्यादित नाही. अधिकृत माहितीनुसार, DIKSHA वर के-१२ (K-12) म्हणजेच प्राथमिक शालेय शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे डिजिटल लर्निंग मटेरियल उपलब्ध आहे. यामध्ये NCERT, CBSE, NIOS आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या बोर्डांशी संबंधित साहित्याचाही समावेश आहे.

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की वर कोर्सेसची कोणतीही निश्चित संस्था किंवा केवळ काही विशिष्ट कोर्स कॅटेगरीज नाहीत. दीक्षा कोर्सेस वेगवेगळ्या प्रकारे शोधाता येऊ शकतात आणि पाहिले जाऊ शकतात. हे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या रिव्हिजन प्रोग्राम शिक्षकांची क्षमता वाढवण्यासाठी आणि व्यवसायिक विकासाशी संबांधित आहेत. हे कोर्सेस वेगवेगळ्या विषयांचे आहेत. त्यामुळे एखादा विद्यार्थी केवळ कोर्सेच नाही तर स्वत: च्या वर्ग आणि विषयानुसार डिजिटल अभ्यासाचे इतर साहित्य देखील शोधू शकतो.

पुस्तकात दिलेला QR कोड कसा काम करतो?

DIKSHA च्या सर्वात उपयुक्त सुविधांपैकी एक म्हणजे क्यूआर कोड असलेली एनर्जाइज्ड टेक्स्टबुक्स (पाठ्यपुस्तके). अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला क्यूआर कोड DIKSHA ॲप किंवा पोर्टलद्वारे स्कॅन केल्यावर त्या धड्याशी संबंधित डिजिटल सामग्रीपर्यंत पोहोचता येते. यामध्ये व्हिडिओ, इन्टरएक्टिव्ह सामग्री आणि इतर शैक्षणिक साहित्य मिळू शकते. याचा फायदा असा होतो की, विद्यार्थी पुस्तकात वाचत असलेल्या अध्यायाशी संबंधित डिजिटल साहित्यापर्यंत थेट पोहोचू शकतो, त्याला इंटरनेटवर ते वेगळ्याने शोधण्याची गरज भासत नाही.

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

DIKSHA वर कोण अभ्यास करू शकतो?

DIKSHA चा वापर विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख, शाळा अधिकारी आणि इतर वापरकर्ते करू शकतात. तथापि, प्रत्येक कोर्ससाठी पात्रता आणि त्यात सहभागी होण्याचे नियम सारखेच नसतात. एखाद्या विशेष कोर्सचा क्रिएटर किंवा मेंटर हे ठरवू शकतो की त्यात कोण सहभागी होऊ शकते. पाहुणे (गेस्ट) म्हणजेच लॉगिन न केलेले वापरकर्ते देखील DIKSHA वर बरीच सामग्री पाहू शकतात. परंतु, कोर्समध्ये औपचारिकपणे सहभागी होण्यासारख्या सुविधांसाठी सामान्यतः नोंदणी (रजिस्टेशन) आणि लॉगिन करणे आवश्यक असते.

Web Title: Diksha portal digital infrastructure for knowledge sharing guide sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • digital
  • education
  • Online Portal
  • PM Modi

संबंधित बातम्या

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
1

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
2

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
3

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!
4

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.