फोटो सौजन्य - Social Media
आयुष्यात एकदा अपयशी झालात म्हणजे तुम्ही आयुष्यातच अपयशी झालात असे नसते. अपयशातून माणूस शिकतो आणि अपयशाहून सुंदर शिक्षण देणारा शिक्षक कुणी नव्हे. शिकाल तरच आयुष्यात टिकाल. अशीच काही अपयशातून यशाकडे जाणाऱ्या राजस्थानच्या ईश्वरलालची कथा आहे. ईश्वरलाल गुर्जर राजस्थानच्या एका खेडेगावातून येतो. अतिशय कमी सुविधांमधून त्यांनी अभ्यास केला आहे. इतर गावकरी मुलांसारखे त्याचे राहणीमान होते. त्यातून तो अभ्यास करत होता. पण त्याने केलेला अभ्यास दहावीत पात्र होण्यासाठी पुरेशा नव्हता. शेवटी, त्याने दहावी अपात्र केली.
ईश्वरलालने येथे खचून जाता पाऊल मागे टाकले नाही, त्याने पुन्हा त्या अपात्र दोन विषयांची तयारी केली आणि पुनर्परीक्षा दिली पण काहीच फायदा नाही. पुन्हा अपयशाखेरीज काहीच हाती लागले नाही. ईश्वरलालने शिक्षण सोडले. तेव्हा काही जवळच्या माणसांनी त्याचे बळ वाढवले. आत्मविश्वास दिला. पुढच्यावर्षी ईश्वरलाल पुन्हा दहावीची तयारी करू लागला आणि दहावी पार केली मग बारावीदेखील उत्तमरीत्या पात्र केली.
ईश्वरलाल त्याच्या गावातील पदवीधर असणारा पहिला मुलगा होता. तसेच पदवीधर होताच त्याने स्थानिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याची भेट स्थानिक IPS मेहून पालशी झाली. त्याने त्यांच्याकडून आदर्श घेत, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. एकदा नाही तर अनेकदा त्यांनी या परीक्षा दिल्या. प्रिलिम्स पार केली तर मेन्स परीक्षेत नापास झाले. दोन्हीही पात्र झाल्या तर मुलाखतीत बाद झाले. पण त्यांनी माघार घेतली नाही.
२०२२ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. २०२४ मध्ये त्यांना ४८३व्या रँकने पात्रता मिळाली. तो IPS अधिकारी म्हणून नावारूपास आला. त्यांचे हे यश अनेक गोष्टी सांगतात की तुम्ही जरी स्पर्धा परीक्षा देत असाल दरम्यान तुमचे आयुष्यही तुमची परीक्षा घेईल. तुम्हाला फक्त हार नाही मानायचे आहे.