JNU विद्यापीठात चाललंय तरी काय? बाहेरच्या लोकांना बोलावून दारु पाजली अन्..
दिल्लीतील JNU विद्यापीठाला शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व जास्त आहे. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दाखल होतात.मात्र सध्या हे विद्यापीठ चुकीच्या गोष्टींसाठी चर्चेत आलं आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नुकतंच वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याची घटना उघड झाली आहे. जेएनयूने विद्यापीठाने दोन विद्यार्थ्यांला दंड भरायला लावला आहे. या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या बाहोरील लोकांना आत बोलवून दारु आणि हुक्का पार्टी केल्याचा गंभीर आरोप विद्यापीठाने केला आहे. तसंच दारुच्या नशेत वसतिगृहातील कर्माचाऱ्यांना वाईट वागणूक दिल्याचं देखील विद्यापीठाने म्हटलं आहे. विद्यापीठाची तत्व शिस्त दावणीला लावत या विद्यार्थ्यांनी केलेलं कृत्य शिक्षेस पात्र असल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांना 1.79 लाख रुपये दंड लावला आहे.
या दारुपार्टीत सामील असलेल्या दोघांपैकी एका विद्यार्थ्याला विद्यापीठाने नोटीस पाठवली असून त्यात सांगितले की, या विद्यार्थ्याच्या खोलीत 12 बाहेरील लोकांना समावेश होता. या १२ जणांना दारुच्या नशेत वसतिगृहात गोंधळ घातला होता. यामुळे इतर विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन कारावा लागला आहे. तसंच विद्यापीठाच्या प्रतिष्ठेची धुळधाण करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केल्याचं विद्यापीठाने म्हटलं आहे. . नोटिसनुसार, हे होस्टेल नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. विद्यार्थ्यावर एकूण 80,000 रुपये दंड लावला गेला आहे, ज्यामध्ये समाविष्ट आहे.
विद्यापीठाच्या दिलेल्य़ा नोटीसानुसार,
60,000 रुपये – विद्यापीठाच्या बाहेरील व्यक्तींना खोलीत बोलावण्यासाठी
2,000 रुपये – नियमांच्या विरोधात जात मद्यपान करण्यासाठी
6,000 रुपये – परवानगीशिवाय इंडक्शन स्टोव आणि हीटर ठेवण्यासाठी
2,000 रुपये – वसतिगृाहत हुक्का ठेवण्यासाठी
10,000 रुपये -वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाईट वागणूक आणि अधिकृत कामामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी, असं विद्यापीठाने रीतसर नोटीस या विद्यार्थ्यांना दिली आहे. ज्यात या विद्यार्थ्यांनी केलेल्या नियमांच्या उल्लंघनबाबत विद्यापिठाने लेखी स्वरुपात सांगितले आहे.
त्याचबरोबर या गुन्ह्यातील दुसऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला पाठवलेल्या नोटिसमध्ये दंडाचा तपशील दिला आहे. या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं की, २२ डिसेंबर आणि ५ जानेवारी रोजी या विद्यार्थ्याच्या खोलीत वसतीगृहाबाहेरील व्यक्ती उपस्थित होत्या. तिथे मद्यपान करण्यात येत होते. नोटिसमध्ये असे म्हटले आहे की वॉर्डन कमिटी आणि सुरक्षा गार्ड्स त्या वेळी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते, पण विद्यार्थ्याने दरवाजा उघडला नाही. या विद्यार्थ्यावर एकूण ९९,००० रुपये दंड लावला गेला आहे. ज्यात समाविष्ट आहे. 85000 रुपये
85,000 रुपये – दोन वेळा बाह्य व्यक्तींना खोलीत बोलावण्यासाठी
2000 रुपये – मद्यपान करण्यासाठी
2000रुपये – हुक्का ठेवण्यासाठी
10,000 रुपये – हॉस्टलमध्ये वाईट वागणूक आणि शांतता भंग करण्यासाठी
ही वाक्ये विद्यार्थ्याच्या नियमानुसार केलेल्या उल्लंघनांबद्दलच्या दंडाची माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना पाच दिवसांचा कालावधी विद्यापीठाकडून देण्यात आला आहे. यापुढे पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यांनी अशी हिंमत करु नये यासाठी हा दंड देण्यात आल्याचं विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.