Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Sehrawat: एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल! सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत यांचा पगार किती?

Sonia Sehrawat News: दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या RAF असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत कोण आहेत? आरएएफमध्ये नोकरी कशी मिळते आणि पगार किती? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 04:10 PM
insta

insta

Follow Us
Follow Us:

Sonia Sehrawat News: दिल्लीतील जंतर-मंतरवर २० जुलै रोजी झालेल्या भाजपच्या आंदोलनादरम्यान कर्तव्यावर तैनात असलेल्या सीआरपीएफच्या (CRPF) ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’च्या  असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत अचानक चर्चेत आल्या आहेत. आंदोलनादरम्यान जखमी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेली एक स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली, ज्यानंतर अनेक युजर्स त्यांच्यावर टीका करत आहेत.

सोनिया सहरावत या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’मध्ये (RAF) असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहेत. त्या मूळच्या हरियाणातील असून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या सीआरपीएफमध्ये रुजू झाल्या होत्या. इन्स्टाग्रामवर कॉकरोचची स्टोरी पोस्ट केल्याने चर्चेत आलेल्या सोनिया सहरावत यांचा पगार किती आहे आणि आरएएफमध्ये नोकरी कशी मिळते, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर चर्चेत का आल्या?

२० जुलै रोजी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान आरएएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चकमकीत सोनिया सहरावत जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटनेची माहिती दिली होती.

मात्र, दोन दिवसांनंतर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी व्हायरल झाली, ज्यामध्ये एका मेलेल्या झुरळाच्या फोटोसोबत “CAN’T FIX THEMSELVES AND THEY WANNA FIX THE COUNTRY” असे लिहिले होते. ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर जोरदार टीका झाली. नंतर ही स्टोरी डिलीट करण्यात आली असली, तरी तिचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले असून त्यांना ट्रोल केले जात आहे.

रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजे काय?

रॅपिड ॲक्शन फोर्स ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक विशेष शाखा आहे. दंगल नियंत्रण, जमाव नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी १९९२ मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली होती. अत्यंत संवेदनशील परिस्थितीमध्ये कमीत कमी वेळेत तैनात होणारे हे विशेष दल आहे.

आरएएफच्या पथकांना नॉन-लॅथल शस्त्रांचा वापर, जमाव नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. महिला आंदोलकांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक कंपनीत महिला जवानांची विशेष टीमही समाविष्ट असते.

National Book Trust Recruitment: आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! अर्ज आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या

आरएएफमध्ये असिस्टंट कमांडंट कसे बनता येते?

आरएएफमध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी थेट स्वतंत्र भरती होत नाही. यासाठी उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) आयोजित केली जाणारी CAPF Assistant Commandant ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

आरएएफसाठी आवश्यक पात्रता

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयत्व: उमेदवार भारतीय नागरिक असावा.

वयोमर्यादा: वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

इतर: उमेदवारांनी निश्चित केलेले शारीरिक आणि वैद्यकीय निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे.

Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात परीक्षा न देता थेट अधिकारी बनण्याची संधी! ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे लगेच ऑनलाईन अर्ज करा

किती मिळतो पगार?

सातव्या वेतन आयोगानुसार, सीआरपीएफमधील ‘असिस्टंट कमांडंट’ हे पद ग्रुप-ए (Group A) दर्जाचे अधिकारी पद आहे.

पे-लेव्हल: पे-लेव्हल १० (Pay Level 10)

वेतनश्रेणी: ₹६७,७०० ते ₹२,०८,७०० प्रतिमहिना.

इतर फायदे: मूळ पगाराव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर अनेक सरकारी सुविधा व भत्ते मिळतात.

Web Title: Who is sonia sehrawat raf assistant commandant salary eligibility selection process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job
  • UPSC

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर
1

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती
2

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू
3

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

UPSC Eligibility : पाकिस्तानचे नागरिक यूपीएससी परीक्षा देऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम
4

UPSC Eligibility : पाकिस्तानचे नागरिक यूपीएससी परीक्षा देऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.