Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण कर्मचारी काम बंद करणार? २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2026 | 06:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील दहावी-बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या परीक्षेचा निकाल यंदा उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण नागपूर विभागातील शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संभाव्य आंदोलनाचा थेट परिणाम निकाल प्रक्रियेवर होण्याची शक्यता असल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Michael Movie : ‘King of Pop ची जादू!’ सिनेमाचा जगभरात क्रेझ; लिमिटेड स्क्रीन्स पण धमक्यावर धमाका

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिक्षण मंडळाने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या बढती आणि बदलीसंदर्भात धोरणात बदल करत ही मुदत २ वर्षांवरून वाढवून ४ ते ६ वर्षांपर्यंत नेली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला असून त्याबाबत राज्य शिक्षण कर्मचारी संघटना यांना विश्वासात घेण्यात आले नाही. परिणामी संघटनांमध्ये असंतोष वाढला असून त्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जर हे आंदोलन प्रत्यक्षात सुरू झाले, तर उत्तरपत्रिकांची तपासणी, गुण नों दणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर काही आठवड्यांत निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा या आंदोलनामुळे निकालाची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेषतः उच्च शिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया, प्रवेश परीक्षा आणि करिअर नियोजनावर याचा परिणाम होऊ शकतो.

Bai Tujha Ashirvad : ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या टीमने केली नाशिकमधील रामकुंड येथे गोदा आरती!

दरम्यान, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन टाळण्यासाठी चर्चा आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही, तर राज्यभरातील निकाल प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अधिकृत घोषणांची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, शासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये लवकरात लवकर समन्वय होऊन निकाल वेळेत जाहीर व्हावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Will education staff stop work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा
1

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.