Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 डिसेंबर रोजी शाळांना लागणार टाळं? राज्यभरात होणार शिक्षकांचे आंदोलन

राज्यातील ५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 03, 2025 | 12:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने स्पष्टपणे पाठिंबा न देण्याचा निर्णय
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात येऊ नये आणि त्यांना वेठीस धरले जाऊ नये
  • टीईटी व इतर प्रलंबित मागण्या सुटण्यासाठी संघटना बांधिल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयासह जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने स्पष्टपणे पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष केशवराव जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दिल्ली-केंद्रशासित प्रदेशतर्फे 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू!

९ नोव्हेंबर रोजी टीईटी अनिवार्यता रद्द करण्यासाठी आणि संच मान्यतेच्या धोरणात बदल करण्यासाठी राज्यभर मुक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात येऊ नये आणि त्यांना वेठीस धरले जाऊ नये, या कारणास्तव शाळा बंद आंदोलनाला समर्थन देणे योग्य नाही, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.

मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही घटक संघटनेने ५ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. आंदोलनाबाबत कोणताही गैरसमज होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित राहावे, म्हणून याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

जाधव यांनी सांगितले की टीईटी व इतर प्रलंबित मागण्या सुटण्यासाठी संघटना बांधिल असून येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ‘धरणे आंदोलन’ करून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान न होता प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतूनच संघटना पुढील कृती आराखडा आखत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Thane News: विद्या प्रसारक मंडळाचा ९० वर्षांचा गौरवशाली प्रवास भव्य सोहळ्यात साजरा!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राज्यातील पहिली ते आठवी, एकंदरीत प्रार्थमिक शिक्षकांसाठी राज्य शासनाने महत्वाचा निणय जारी केला आहे. एकंदरीत, शिक्षकांना आता २०२७ पर्यंत TET परीक्षा पात्र करणे आवश्यक आहे. जर ते करू शकले नाही, तर त्यांच्या हाताची नोकरी ते गमावून बसतील. त्यामुळे शिक्षकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

Web Title: Will schools be closed on december 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Maha TET
  • TET
  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.