Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI च्या जोरावर उजळणार तुमच्या मुलाचे भविष्य! ‘हे’ ५ कोर्सेस देतील लाखो-करोडोंचे पॅकेज; आजच करा तयारी

AI Jobs 2026: तुमच्या मुलाला भविष्यात तगड्या पगाराची नोकरी हवी असेल, तर AI क्षेत्रातील हे ५ कोर्सेस नक्की निवडा. बी.टेक, बीसीए ते डिप्लोमा कोर्सेसची फी, कालावधी आणि नोकरीच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 22, 2025 | 08:50 PM
AI च्या जोरावर उजळणार तुमच्या मुलाचे भविष्य! (Photo Credit - X)

AI च्या जोरावर उजळणार तुमच्या मुलाचे भविष्य! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • AI शिका आणि करिअर घडवा!
  • पालकांसाठी महत्त्वाचे
  • हे ५ कोर्सेस आहेत सध्या टॉपवर
Top 5 AI Courses: सध्याच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असून प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा बोलबाला वाढत आहे. शाळा, कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत आता एआयचा वापर अनिवार्य होत आहे. जर तुमच्या पाल्याने नुकतीच १२ वी उत्तीर्ण केली असेल आणि त्याला भविष्यात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून द्यायची असेल, तर AI मधील करिअर हा सर्वोत्तम पर्याय आहे. खालील ५ कोर्सेस तुमच्या मुलाला भविष्यातील ‘सुपर सॅलरी’ मिळवून देण्यासाठी गेमचेंजर ठरू शकतात:

१. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डिप्लोमा (Diploma in AI)

ज्यांना कमी वेळेत एआय शिकायचे आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात पायथन प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग आणि डेटा प्रोसेसिंगचे बेसिक ज्ञान दिले जाते.

  • कालावधी: ६ महिने ते २ वर्षे.
  • फी: ५० हजार ते ३ लाख रुपये.
  • संधी: एआय टूल हँडलर, बेसिक प्रोग्रामर.
२. बी.टेक इन AI आणि डेटा सायन्स (B.Tech in AI & Data Science)

जर मुलाने १२ वी सायन्स शाखेतून पूर्ण केली असेल, तर हा ४ वर्षांचा इंजिनिअरिंग कोर्स त्याला थेट एआय एक्सपर्ट बनवू शकतो. यात क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस (R, Python, C++) शिकवल्या जातात.

  • फी: सरकारी कॉलेजमध्ये ७५ हजार ते १.५ लाख (वार्षिक), खाजगी मध्ये १.५ ते ४ लाख रुपये.
  • संधी: डेटा सायंटिस्ट, एआय तज्ज्ञ (हेल्थ आणि फायनान्स सेक्टर).
हे देखील वाचा: सॉफ्टवेअर इंजिनिअरने रस्ता साफ करण्यासाठी सोडली नोकरी, आज पगार मिळतो 100000 रुपये

३. बी.सी.ए. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (BCA in AI)

फक्त सायन्सच नाही तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीही हा कोर्स उपलब्ध आहे. यात कॉम्प्युटर ॲप्लिकेशनसह एआय आणि डीप लर्निंगचे प्रगत तंत्र शिकवले जाते.

  • फी: ५० हजार ते ३ लाख रुपये (वार्षिक).
  • संधी: एआय इंजिनिअर, डेटा ॲनालिस्ट.
४. बीएससी एआय आणि डेटा सायन्स (B.Sc in AI & Data Science)

हा ३ वर्षांचा पदवी कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स फायदेशीर आहे. यात सांख्यिकी (Statistics) आणि डेटा मायनिंगवर भर दिला जातो.

  • फी: ३० हजार ते ३ लाख रुपये (वार्षिक).
  • संधी: ई-कॉमर्स आणि आयटी क्षेत्रात डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरी.
५. रोबोटिक्स आणि एआय डिप्लोमा (Diploma in Robotics & AI)

ज्या मुलांना सॉफ्टवेअरपेक्षा हार्डवेअर आणि मशीनमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स बेस्ट आहे. यात रोबोट बनवणे, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि मशीनरीचे प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते.

  • फी: ४० हजार ते ३ लाख रुपये.
  • संधी: मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक कंपन्यांमध्ये मोठी संधी.
हे देखील वाचा: Education Department : विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी

Web Title: With the power of ai your childs future will shine bright these 5 courses will offer packages worth millions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • ai
  • AI technology
  • Artificial intelligence
  • Career News

संबंधित बातम्या

भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर
1

भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर

2030 पर्यंत 50 लाख भारतीय तरुणांना AI, सायबरसिक्युरिटी आणि क्वांटममध्ये प्रशिक्षित करण्याची IBMची योजना
2

2030 पर्यंत 50 लाख भारतीय तरुणांना AI, सायबरसिक्युरिटी आणि क्वांटममध्ये प्रशिक्षित करण्याची IBMची योजना

Police Recruitment 2025: ‘या’ राज्यात कॉन्स्टेबल आणि PSI साठी 13591 रिक्त पदं, अर्ज करण्याची शेवटची तारीख; त्वरा करा
3

Police Recruitment 2025: ‘या’ राज्यात कॉन्स्टेबल आणि PSI साठी 13591 रिक्त पदं, अर्ज करण्याची शेवटची तारीख; त्वरा करा

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
4

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.