Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: कुरियर बॉय असल्याचं भासवलं अन्…; कोंढव्यात उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर…

पीडित तरुणी मूळची अकोल्याची असून, सध्या ती आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत होती. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका खासगी कंपनीत काम करते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 03, 2025 | 01:19 PM
Pune Crime News: कुरियर बॉय असल्याचं भासवलं अन्…; कोंढव्यात उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर…
Follow Us
Close
Follow Us:

Pune Crime News : कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.  बुधवारी (२ जुलै) रात्री हा प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत सायंकाळी साडेसातच्या सुमारास  हा सर्व प्रकार  घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे भासवून सोसायटीत प्रवेश मिळवला. दरवाज्यावर पोहोचल्यानंतर त्याने पीडितेला बँकेचं कुरिअर असल्याचे सांगितले. यानंतर जबरदस्तीने घरात प्रवेश करत पीडितेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारानंतर  पीडित तरूणीने  पोलिसांकडे  तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपीने वापरलेल्या मार्गाचा आणि ओळखीचा तपास करण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर

शहरातील कोंढवा परिसरातल्या एका उच्चभ्रू आणि गार्डेड सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना  बुधवारी (२ जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास  घडली. या प्रकरणाचा पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला असून, आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. पीडित तरुणी मूळची अकोल्याची असून, सध्या ती आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत होती. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका खासगी कंपनीत काम करते.

अत्याचाराची घटना कशी घडली?

प्राथमिक तपासानुसार, आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीत प्रवेश मिळवला. दरवाज्यावर आल्यानंतर त्याने बँकेचे कुरिअर असल्याचे सांगितले. पीडितेने हे कुरिअर आपले नसल्याचे सांगितले असतानाही आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला. त्यामुळे तरुणीने सेफ्टी डोअर उघडला. तेवढ्यात आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घडल्यावर तरुणीला शुद्ध येताच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

धक्कादायक ! वर्धा जिल्ह्यात चक्क श्वानावर लैंगिक अत्याचार; 67 वर्षीय ज्येष्ठाचं घृणास्पद कृत्य

सोसायटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

ही संतापजनक घटना सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये घडल्याने सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे रूप घेऊन प्रवेश मिळवला. सुरक्षारक्षकांकडून फारशी चौकशी झाल्याचे दिसून आले नाही. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीच्या ओळखीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

Web Title: 25 year old girl sexually assaulted in an elite society in kondhwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • Pune Crime
  • Pune crime news in marathi

संबंधित बातम्या

PMC Election 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी; तुरुंगातून लढवणार निवडणूक
1

PMC Election 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी; तुरुंगातून लढवणार निवडणूक

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
3

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.