Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case:भक्तांच्या श्रद्धेचा बाजार! अशोक खरातचा ५ लाखांचा ‘विजिटिंग चार्ज

Ashok Kharat Nashik Case- त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, अमावस्या आणि पोर्णिमेच्या मुर्हुर्तावर या बाबाला आपल्या घरी नेण्यासाठी श्रीमंताच्या चढाओढ सुरु असायच्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 31, 2026 | 11:24 AM
Ashok Kharat Nashik Case, Fake Baba Investigation SIT, Ashok Kharat Fee Details,

Ashok Kharat Nashik Case, Fake Baba Investigation SIT, Ashok Kharat Fee Details,

Follow Us
Close
Follow Us:
  • अशोक खरात फक्त स्थानिक पातळीपर्यंतच नव्हे अनेक बड्या मंडळींपर्यंत संपर्कात
  • दीड ते दोन तासांच्या भेटीसाठी (आऊटडोअर व्हिजिट) तब्बल ५ लाख रुपये फी
  • खरातच्या कार्यालयातील काचा आणि दरवाजा ‘साऊंड प्रूफ’ असल्याचे निदर्शनास आले आहे.
 

Ashok Kharat SIT investigation details: महिलांची फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे. तसतसा त्याच्या काळ्या आणि धक्कादायक कारामाने उघडकीस येत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा अशोक खरात तब्बल पाच लाख रुपये फी घ्यायचा. इतकेच नव्हे तर त्याची आलीशान जीवनशैली आणि लोकांची फसवणूकीचे अनेक प्रकारही या तपासात समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात फक्त स्थानिक पातळीपर्यंतच नव्हे अनेक बड्या मंडळींपर्यंत संपर्कात होता. अशोक खरात बाहेरच्या एक दीड तासांच्या भेटीसाठी तब्बल पाच लाख रुपयांची फी उकळायचा. अंतर जितके जास्त तितकी फीची रक्कम जास्त असेही त्याचा हिशोब होता. भक्तांचा घरी किंवा फार्महाऊसवर जाण्यासाठी तो महागड्या गाड्यांची मागणी करत होता.

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय,

विमान प्रवास आणि ५ लाखांची फी

अशोक खरात याचा आवाका फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित नव्हता, तर त्याचे जाळे मोठे होते. एसआयटीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात केवळ दीड ते दोन तासांच्या भेटीसाठी (आऊटडोअर व्हिजिट) तब्बल ५ लाख रुपये फी उकळायचा. अंतर जितके जास्त, तितकी त्याची फी वाढत असे. भक्तांच्या घरी किंवा फार्महाऊसवर जाण्यासाठी तो महागड्या आणि आलिशान गाड्यांची मागणी करायचा. आश्चर्याची बाब म्हणजे लांबच्या प्रवासासाठी तो थेट विमान प्रवासाचीच मागणी करत होता.

त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, अमावस्या आणि पोर्णिमेच्या मुर्हुर्तावर या बाबाला आपल्या घरी नेण्यासाठी श्रीमंताच्या चढाओढ सुरु असायच्या. पहाटेपासूनच खरातच्या घराबाहेर आलिशान गाड्यांच्या रांगा लागायचया. जो व्यक्ती जास्त पैसे देईल खरात त्याच्याकडे जायचा, अशीही चर्चा सुरू आहे.

एसआयटीच्या पथकाने सोमवारी खरातच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. यात कारवाईत अनेक मोठे पुरावे मिळाले आहेत. खरातच्या कार्यालयातून खराब झालेले पेढे, जडीबुटीसाठी दिसणारी काळी फळे आणि इतर काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जे भक्त खरातकडे येत होते, त्यांच्या नावांची यादी असलेली एक वहीदेखील पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातून अनेक बड्या लोकांची नावे समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

 

साऊंड प्रूफ काचा आणि दरवाजा: नियोजित षडयंत्र?

तपासादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या कार्यालयातील काचा आणि दरवाजा ‘साऊंड प्रूफ’ असल्याचे निदर्शनास आले आहे. पीडितेचा आवाज बाहेर जाऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये, यासाठी खरातने मुद्दाम ही व्यवस्था केली होती का? याचा तांत्रिक तपास आता फॉरेन्सिक टीमकडून केला जात आहे. जर हे सिद्ध झाले, तर खरातने हे सर्व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे स्पष्ट होईल.

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह; टॅटूमुळे ओळख पटली

 

गुन्ह्याचे रिक्रिएशन: कार्यालयात पीडितेचा थरकाप

पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून अशोक खरातला त्याच्या कार्यालयात नेऊन गुन्ह्याचे ‘रिक्रिएशन’ केले. यावेळी पीडितेची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र, ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाले, त्या कार्यालयात पाऊल ठेवताच पीडितेला तो प्रसंग आठवून अश्रू अनावर झाले. तिचा थरकाप उडाला होता, ज्यामुळे काही काळ तपासाचे काम थांबवावे लागले.

पोलीस कोठडी संपण्यापूर्वी तपासाचा ‘धडाका’

खरातची पोलीस कोठडी संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे एसआयटीने आपली चक्रे वेगाने फिरवली आहेत. खरात अटकेत गेल्याचे पाहून आता अनेक फसवणूक झालेले लोक पुढे येत आहेत. केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर खरातने शेकडो लोकांची *किती कोटींची फसवणूक* केली आहे, याचा आकडा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. खरातच्या संपर्कातील बड्या धेंडांची नावेही तपासात निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

Web Title: 5 lakh fee for 90 minutes sit reveals lavish lifestyle of fake baba ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी
1

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Ashok Kharat Case : SIT चौकशीलाच चाकणकरांची दांडी; कारण दिलं ‘प्रवास करण्यास असमर्थ…’
2

Ashok Kharat Case : SIT चौकशीलाच चाकणकरांची दांडी; कारण दिलं ‘प्रवास करण्यास असमर्थ…’

Ashok Kharat : नीलम गोऱ्हे सुद्धा अशोक खरातच्या भक्त? राजकीय फायद्यासाठी केली नाशिकवारी
3

Ashok Kharat : नीलम गोऱ्हे सुद्धा अशोक खरातच्या भक्त? राजकीय फायद्यासाठी केली नाशिकवारी

Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत होता?
4

Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत होता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.