Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

Nashik Crime News: सिटी सेंटर मॉल परिसरात गोळीबाराच्या आवाजाने खळबळ! निवृत्त सहाय्यक RTO अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून संपवले जीवन; कारण अस्पष्ट, पोलिसांचा सखोल तपास सुरू!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 09:59 AM
Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी... निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी... निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

Follow Us
Follow Us:
  • निवृत्त सहाय्यक RTO अधिकारी हेमंत हेमाडे यांची गोळी झाडून आत्महत्या
  • नेमके कारण अस्पष्ट; कौटुंबिक कारणाचा प्राथमिक अंदाज
  • पोलिसांकडून पंचनामा; मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू
Nashik Crime News: नाशिक शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील राहत्या घरात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे नाशिक शहरातील प्रशासकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका

राहत्या घरात गोळी झाडून संपवले जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त सहाय्यक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे हे नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी राहत्या घरातच स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. घरातून गोळीबाराचा आवाज येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.

हेही वाचा: Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

कारणाबाबत तर्कवितर्क; पोलीस तपास सुरू

हेमंत हेमाडे यांनी हा टोकाचा निर्णय नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा इतर कोणताही महत्त्वाचा ऐवज मिळाला का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील निवृत्त अधिकाऱ्याने अशाप्रकारे जीवन संपवल्याने विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नाशिकमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे?

    Ans: नाशिकमधील निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

  • Que: ही घटना नाशिकमध्ये कुठे घडली?

    Ans: ही घटना नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली.

  • Que: या आत्महत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे; पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Nashik retired rto officer suicide gunshot city centre mall sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Nashik Crime
  • RTO
  • Suicide case

संबंधित बातम्या

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…
1

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!
2

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
3

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.