crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: देशातून अनेक सायबर गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आले आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाने भामटे अनेक पैसे उकळतात आणि पीडित व्यक्तीला याची कुणी कुणी सुद्धा लागत नाही. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. एका महिलेची तब्बल ८.७० रुपायनाची फसवणूक करण्यात आली आहे. त्या महिलेच्या खात्यातून ही रक्कम अचानक कंबोडिया या देशात पाठवली जाऊ लागल्याने IB सारख्या केंद्रातील यंत्रणांना संशय आला. IB ने मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर शाखेला त्याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. मुंबई पोलीस महिलेच्या घरी दाखल झाले खरे पण महिला त्यांना खरे पोलीस मानण्यास तयारच नव्हती.
Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ
नेमकं काय झालं?
दक्षिण मुंबईतील ८१ वर्षीय महिलेला १० जुलै रोजी अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्या महिलेला पोलीस असल्याची बतावणी केली. या अनोळखी इसमाने ती महिला मनी लॉन्ड्रिंग करत असल्याचा दावा केला. महिलेचा विश्वास बसावा म्ह्णून कुलाबा पोलीस ठाण्याबाहेरील पोलिसांच्या वेशातील स्वतःचा व्हिडीओ देखील त्याने महिलेला पाठवला आणि महिलेची डिजिटल अरेस्ट केली. ही महिला सायबर ठकाच्या जाळ्यात अडकली. तिने डिजिटल अरेस्टच्या भीतीने स्वतःलाच स्वतः च्या घरात कोंडून घेतलं.
महिन्याभरात उकळले कोट्यवधी रुपये
फसवणूक झालेली महिला ही तेल कंपनीत उच्च पदावरून निवृत्त झाली होती, तिच्याकडे पैश्यांची काही कमी नव्हती. या महिलेला कारणांनी धमकावून तिच्याकडून पैसे उकळू लागले. अवघ्या महिन्याभरात या सायबर गुन्हेगारांनी महिलेकडून 8.70 कोटींहून अधिकची रक्कम उकळली. महिलेच्या खात्यातील पूर्ण पैसे संपले तेव्हा भामट्यांनी तिला तिच्या बँकेतील ठेवी, म्युचुअल फंड तसेच शेअर विकायला देखील त्यांनी भाग पाडलं. बँकवाल्यानी विचारलं तेव्हा दुबईत मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे उभे करतेय अस सांगण्यास देखील त्यांनी महिलेला बजावलं होत.
हा फ्राऊड कसा समोर आला?
या महिलेने जेव्हा काही कारण नसतांना अचानक कोट्यवधी रुपये कंबोडियात पाठवत असल्याचे IB ला समजले तेव्हा केंद्रातील IB सारख्या यंत्रणांना संशय आला. त्यांनी मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला.
पोलिसांना समजले भामटे!
मुंबई पोलीस महिलेच्या घरी गेले तेव्हा महिलेने ते पोलीस असल्याचं मान्य करण्यास नकार दिला. सायबर ठकाला याची जाणीव होती की आज ना उद्या पोलीस महिलेच्या दारात येणार म्हणून त्यांनी महिलेला आधीच त्यांच्याविषय सांगून ठेवला होता. त्या महिलेला सांगितले होते की, आज ना उद्या पोलीस येतील पण ते खरे पोलीस नसतील आम्ही खरे पोलीस आहोत. असं सांगून त्यांनी महिलेला भ्रमित करून ठेवलं होत. त्यामुळे जेव्हा पोलीस आले तेव्हा महिलेने त्यांना घरात घ्यायला स्पष्ट नकार दिला. शेवटी पोलीस इमारतीच्या मालकाला घेऊन महिलेच्या घरी गेले. तेव्हा डिजिटल अरेस्टमध्ये सायबर गुन्हेगार ज्या मोडस ऑपरेंडी वापरतात ती त्यांनी महिलेला सांगितली. तेव्हा कुठे तिचा खऱ्या पोलिसांवर विश्वास बसला.
पोलिसांनी महिलेचे खाते केले ब्लॉक
ती ज्येष्ठ महिला आपल्या खरे पोलीस मनात नाही हे ऐकून पोलिस धास्तावले होते. मात्र महिलेची आणखीन फसवणूक होणे देखील पोलिसांना मान्य नव्हते. पोलिसांनी थेट 1930 या सायबर हेल्पलाईनवर फोन केला. त्यांना महिलेच्या खात्याचा क्रमांक दिला तसेच transaction ID दिले आणि आधी महिलेची खाती ब्लॉक केली. अशा प्रकारे एखाद्याचे खाते पोलिसांनी स्वतः पुढाकार करुन ब्लॉक करणे ही पहिलीच केस आहे.स्वतः च्या ठेवी, म्युचुअल फंड मधील रक्कम, शेअर मार्केटमधील रक्कम सायबर गुन्हेगारांना देणारी महिला आपलं रहात घर देखील विकेल याची पोलिसांना भीती होती. म्हणून पोलिसांनी स्वतःच तक्रार करत महिलेची सगळी बॅक खाती ब्लॉक केली.अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून ज्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला