Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : ‘तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेन…’, 13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत एका 13 वर्षांच्या मुलीवर तिच्या आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत आजोबांनी महिनाभर नातीवर लैंगिक अत्याचार केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2024 | 01:04 PM
13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)

13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Mumbai Crime News In Marathi: राज्‍यात महिला अत्‍याचाराच्‍या घटना तर देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. अशातच आता मुंबईतील पवई परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. मुंबईतील पवई परिसरात १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.40 वर्षीय चुलत आजोबांनी 13 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्याला अटक केली. या घटनेमुळे पवईमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी आजोबाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पवई पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा मामा आहे. पीडितेची आई कामावर गेल्यानंतर आरोपी गेल्या एक महिन्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. पीडितेसोबत गैरवर्तन केल्यानंतर आरोपीने हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी घाबरली होती आणि त्यामुळेच तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.

‘संयमाची परीक्षा पाहू नका’,अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा CID ला इशारा

लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला जवळच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेव्हा कळले की त्यात काहीतरी गडबड आहे. घरच्यांनी मुलीकडे विचारणा केली असता मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. पवई पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मूळचा बिहारचा आहे. सध्या ते पवई परिसरात राहतात.पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी मुंबईतील अँटॉप हिल परिसरात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. आरोपीने मुलीला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला होता. मुलीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अँटॉप हिल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

मुंबई महिलांसाठी असुरक्षित

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुंबईतील उच्चभ्रू संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएसएमटी परिसरात महिलांवरील अत्याचाराची अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर मुंबईच महिलांसाठी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच घटनांनंतर लवकरात लवकर कठोर नियम बनवून आरोपींना शिक्षा द्यावे, ही मागणी आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना; केवळ 8 महिन्यांत 230 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

Web Title: A 13 year old girl was allegedly molestation by her grandfather in mumbai powai area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
1

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त
3

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
4

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.