अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या (File Photo : Farmer Suicide)
नाशिक : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागात एकूण 230 शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी सर्वाधिक 137 आत्महत्या या एकट्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 97 शेतकत्यांचे कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र ठरले असून, 48 शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने ते सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.
हेदेखील वाचा : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; एकनाथ शिंदे खातेवाटपात सकारात्मक नसतील तर त्यांना…
डोक्यावर कर्जाचा डोंगर, नापिकी आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या 8 महिन्यांच्या काळात नाशिक विभागात एकूण 230 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे.
धुळे जिल्ह्यातील 44 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. ही समाधानकारक बाब मानली जात आहे. सर्वाधिक आत्महत्या या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. याठिकाणी 137 शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आठ महिन्याच्या काळात आत्महत्या झाली नाही, असा एकही महिना उजाडला नाही.
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून केली जातीये मदत
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी पातळीवरून लाखो रुपयांची मदत करण्यात येते. बारावी उत्तीर्ण पाल्यांचे पुढील शिक्षण थांबू नये म्हणून राज्य बँकेमार्फत 15 लाख लाख रुपयांचे कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. विभागात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 230 इतकी असली तरी मदतीसाठी केवळ 98 शेतकऱ्यांचेच कुटुंब पात्र ठरले आहेत. परिपूर्ण अहवाल नसल्याने 48 शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार आहेत. तर 84 शेतकऱ्यांचे प्रस्ताव चौकशी अभावी प्रलंबित आहेत.
सरकारी आकडेवारीतून वास्तव समोर
केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 8-10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शासकीय आकडेवरीतून ही माहिती समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा मनोधैर्य पूर्त खचल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं जात आहे.
हेदेखील वाचा : मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी