एकतर्फी प्रेम! 'तू माझ्यावर प्रेम कर...', तरुणाच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने संपवल आयुष्य
छत्रपती संभाजीनगर येथे १६ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएस करणाऱ्या तरुणीने वसतीगृहात आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता आता एकतर्फी प्रेमातून एक तरुण एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडली आहे. आरोपी तरुण तरुणीला ‘माझ्यावर प्रेम कर…’ अशी जबरदस्ती करत होता.
कासिम यासीन पठाण नावाचा तरुण 16 वर्षीय तरुणीला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उचलं. या तरुणाचे प्रकरण तात्काळ थांबवावे, अशी मागणी तरुणीच्या कुटुंबीयांनी केली असून, त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले जाईल. रात्री उशिरा हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी आला आहे.
आरोपी कासिम यासीन पठाण हा गॅरेजमध्ये काम करायचा. या तरुणाच्या जाचाला कंटाळून 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रविवारी (18 ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास एका विहीरीत उडी मारून तिने तिचं आयुष्य संपवलं. पूजा शिवराज पवार मृत तरुणीचं नाव आहे.
पूजा ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती. शहरात एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिने क्लास लावला असल्याने ती शहरातच राहत होती. रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. मागील आठ महिन्यांपासून आरोपी कासिम हा प्रेम कर… अशी बळजबरी करुन मुलीला त्रास देत होता. ही बाब तिने तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी चार ते पाच वेळेस त्याला समजही दिली होती.