Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूरनंतर नायगावमध्ये पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना, शाळेत 7 वर्षीय चिमुरडीवर 5 वेळा लैंगिक अत्याचार

कोलकाता, बदलापूर येथील लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटना ताजे असताना आज पुन्हा महाराष्ट्रातील नायगाव परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. या परिसरात एका 7 वर्षीय चिमुरडीवर पाच वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 24, 2024 | 05:57 PM
बदलापूरनंतर पालघरमध्ये पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना, शाळेत 7 वर्षीय चिमुरडीवर 5 वेळा लैंगिक अत्याचार

बदलापूरनंतर पालघरमध्ये पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना, शाळेत 7 वर्षीय चिमुरडीवर 5 वेळा लैंगिक अत्याचार

Follow Us
Close
Follow Us:

बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहे. बदलापुरात काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानतंर मंगळवारी नाशिकमध्ये एका साडे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता पालघरमधील नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेतील ७ वर्षीय बालिकेवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ४-५ वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.विशेष म्हणजे शाळेने हे प्रकरण न दडवता पोलिसांकडे तक्रार केली.

पीडित बालिका या शाळेत दुसर्‍या इयत्तेत शिक्षण घेत आहे. कॅन्टीन मध्ये जाण्यास तिने नकार दिल्यावर सदर प्रकार उघड झाला.कॅंटीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असे तिने सांगितल्यानतंर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केल्यावर कॅंटीनमध्ये काम करणारा मुलगा लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.

सदर चार घॄणास्पद अत्याचार तिने आपल्या घरीही सांगितला होता. मात्र पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी त्वरीत याबाबतची माहिती नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी मुलाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.तो विधीसंघर्षग्रस्त असल्याची अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

आरोपी दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य मुलींसोबत असा प्रकार घडला का त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी तयार नव्हते. मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा प्रकार दडवून न ठेवता पोलिसांना माहिती दिली.

Web Title: A 7 year old girl was molested in naigaon school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 05:57 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
2

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
3

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या
4

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.