
दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन अज्ञात तरुण हातात कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन एका तरुणाच्या मागे लागले. जीव वाचवण्यासाठी संबंधित तरुणाने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. काही अंतरावर त्याला गाठल्यानंतर दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये दोन तरुण एका व्यक्तीचा पाठलाग करत असल्याचे आणि त्याच्यावर हल्ला करत असल्याचे दिसत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या परिसरात घडलेला हा प्रकार नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.
दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या आळंदीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांनी हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला
मित्रासोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले देवेंद्र उत्तमराव सावरकर (वय ५०, रा. न्यू पँथरनगर, नंदनवन) यांच्यावर दोघांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आधी मारहाण केली आणि नंतर लोखंडी कडा व दगडाने वार केल्याने त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अमन उत्तम मेश्राम (वय २५, रा. पडोळेनगर, वाठोडा रोड) आणि अश्लेष शिवशंकर अडिकने (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत.
Ans: आळंदी नगर परिषद परिसरात १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
Ans: दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार कोयते आणि शस्त्रांनी तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर वार केले.
Ans: हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला की अन्य कारणामुळे, याचा तपास आळंदी पोलीस करत आहेत.