खड्डे चुकवण्याच्या नादात भीषण अपघात; कार दुचाकीला धडकली अन्...
मंचर : राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी माठ झाल्याचे दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी गावच्या हद्दीत गण्या डोंगरजवळ सोमवारी सकाळी दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार सचिन ज्ञानेश्वर पडवळ (वय २९, रा. सविंदणे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खड्डे टाळताना समोरासमोर धडक
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पडवळ हे कामानिमित्त मंचरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी लालखान पठाण (वय ५२, रा. मंचर) हे आपल्या कुटुंबासह इंडिका गाडीने जेजुरी येथे रुग्णालयात जात होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास, मेंगडेवाडी हद्दीतील मुक्ताबाई मंदिराजवळ दोन्ही वाहने एकमेकांवर आदळली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, दुचाकीस्वार पडवळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिका चालक संदीप घुले यांच्या मदतीने तातडीने पारगाव येथील ‘ओम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खड्ड्यांमुळे वारंवार अपघात
अपघात रस्त्यावरील खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे असून ते अपघातांना निमंत्रण देत आहेत.
हे सुद्धा वाचा : शिरोलीत दोन ठिकाणी चोरी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
स्थानिक प्रशासनाकडे मागणी
मेंगडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सावळेराम मेंगडे यांनी सांगितले की, “अवसरी ते पारगाव रस्त्यावर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकावर बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्यू झालेल्या सायकल चालकाचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात
सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ.