Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; राजकीय वर्तुळात खळबळ

बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकत कारवाई करून पुणे पोलिसांनी माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथून तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट असा २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू होता. कोंढव्यातील द व्हिलेज हॉटेलवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2024 | 11:55 AM
माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; राजकीय वर्तुळात खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकत कारवाई करून पुणे पोलिसांनी माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथून तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट असा २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू होता. कोंढव्यातील द व्हिलेज हॉटेलवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता पुण्यातील अन्य काही हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आली आहेत. बाकीर रमेश बागवे (३६, रा. भवानी पेठ), हरून नबी शेख (२५), बिक्रम साधन शेख (२०), अमानत अन्वर मंडळ (२२), अमानत अन्वर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बाकीर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनंतर कारवाई

कोंढवा भागातील व्हिलेज हॉटेलमध्ये अवैधरित्या नागरिकांना हुक्का पुरविला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस तपास करत आहेत. कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत 23 हजार 500 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच हुक्‍क्‍याचे फ्लेवर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉटही जप्त करण्यात आले आहेत.

बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरवल्याने कारवाई

हा संबंधित हुक्का पार्लर हा माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत होता. त्यामुळे त्यांच्या मुलासह 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरवला जात होता. याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: A case has been filed against the son of the former minister of state for home affairs nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
4

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.